Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख
No Result
View All Result
Mulukh Maidan
No Result
View All Result

धक्कादायक! परीक्षा देणारे विद्यार्थीच निघाले कोरोना पॉझिटिव्ह: ६०० पालकांवर गुन्हे दाखल

July 22, 2020
in आरोग्य, इतर, ताज्या बातम्या
0
धक्कादायक! परीक्षा देणारे विद्यार्थीच निघाले कोरोना पॉझिटिव्ह: ६०० पालकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

 

केरळ। देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. या महामारीमुळे देशातील शैक्षणिक वेळापत्रक कोलमडून पडले आहे. अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, केरळमध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी जवळपास ६०० विद्यार्थ्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. केरळमध्ये अभियांत्रिकी, वास्तुस्थापत्य (आर्किटेक्चर), वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात आली.

परीक्षेला उपस्थित असलेला एक १७ वर्षीय विद्यार्थी बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला. तर मंगळवारी दोन विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. दरम्यान, केरळ पोलिसांनी परीक्षेला बसलेल्या ६०० विद्यार्थ्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन अनेक राज्यांनी शैक्षणिक वर्षही उशिराने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देखील काही परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

विशेषतः महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे राज्य सरकारने ऑनलाईन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास सुरूवात केली आहे.

तर अंतिम वर्षाच्या परीक्षांचा निर्णय अजून निश्चित झालेला नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाने याविषयी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. परंतु राज्य सरकार मात्र, परीक्षा न घेण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे.

Tags: Corona positiveCovid १९Engineering and Medical Entrance Pre-ExaminationkeralaOnline Academic YearParentsSocial DistanceStudentsUnion Ministry of Manpower Developmentअभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षाऑनलाइन शैक्षणिक वर्षकेंंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयकेरळकोरोना पॉझिटिव्हपालकविद्यार्थींसोशल डिस्टन्सिंग
Previous Post

रतन टाटांनी टाटा गृपबाबत केली महत्वाची घोषणा; वाचा कोण असू शकतं नवीन चेअरमन..

Next Post

अमेरीकेत रस्त्यावर ठेवलेत फ्रिज; कुणीही या आणि काहीही घेऊन जा, पुर्णपणे मोफत

Next Post
कोरोनाच्या संकटात हा फ्रीज देतोय मायेचा थंडावा; २४ तास असतो भरलेला, काहीही घेऊन जा!

अमेरीकेत रस्त्यावर ठेवलेत फ्रिज; कुणीही या आणि काहीही घेऊन जा, पुर्णपणे मोफत

ताज्या बातम्या

जितेंद्र आव्हाडांकडून पंतप्रधान मोदींची हिटलरशी तुलना, म्हणाले…

जितेंद्र आव्हाडांकडून पंतप्रधान मोदींची हिटलरशी तुलना, म्हणाले…

February 25, 2021
हुंड्यात मिळाले ११ लाख; मात्र वरपित्याने केलेल्या कृतीमुळे वऱ्हाडी मंडळींना बसला जबर धक्का…

हुंड्यात मिळाले ११ लाख रुपये, भर लग्नात वरपित्याने केले असे काही की, तुम्हीही कराल कौतुक

February 25, 2021
‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; ७ मार्चला होणार मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित

‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; ७ मार्चला होणार मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित

February 25, 2021
‘या’ बाॅलीवूड अभिनेत्रीच्या आईला झाला कॅन्सर; अभिनेत्री म्हणते माझ्या आईसाठी…

‘या’ बाॅलीवूड अभिनेत्रीच्या आईला झाला कॅन्सर; अभिनेत्री म्हणते माझ्या आईसाठी…

February 25, 2021
पूजा चव्हाण प्रकरणात ‘गबरु’ची एन्ट्री; पूजा चव्हाणच्या लॅपटॉपमधून आणखी एक धक्कादायक गौप्यस्फोट

पूजाच्या लॅपटॉपमधून झाला गौप्यस्फोट; नव्या ऑडिओ क्लीपमध्ये बोलणारा ‘गबरू शेठ’ कोण?

February 25, 2021
पाठक बाईंचा राणा दा मध्ये जीव रंगला, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल नक्की मॅटर काय आहे?

पाठक बाईंचा राणा दा मध्ये जीव रंगला, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल नक्की मॅटर काय आहे?

February 24, 2021
ADVERTISEMENT
  • Mulukh Maidan

Website Maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शेती
  • मनोरंजन
  • खेळ
  • इतर
  • लेख

Website Maintained by Tushar Bhambare.