‘धक्कादायक ! पुण्यात उपचाराअभावी तडफडताय कोरोना रुग्ण’

 

पुणे | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ दिसून येत आहे.

आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावांमधील कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळेनासे झाले आहे, अशी माहिती समोर आली आहे.

तसेच या शहरा लगतच्या गावांमध्ये कोरोना रुग्णांची परिस्थिती अगदी दयनीय झाली आहे. यामुळे आता या गावांमधील कोरोना रुग्ण उपचाराअभावी अक्षरशः तडफडू लागली आहे.

या गावांना आरोग्य विभागाचे काही सहकार्य मिळत नसून आरोग्य विभागाची टीम या ठिकाणी फिरकत नाही. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाही काही दिवस उपचार मिळत नसल्याने घरातच रहावे लागत आहे.

दरम्यान, आता फक्त जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात (नगरपालिका आणि कंटेन्मेंट बोर्ड वगळता) एकूण १ हजार २३५ कोरोना रुग्ण आढळून आले आहे.

फक्त ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या आढळून येणारा पुणे हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.