धक्कादायक! कोरोना योद्ध्यांवर केला जवळपास २०० ते २५० जणांच्या जमावाने हल्ला

 

रत्नागिरी। राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संक्रमनामुळे नागरिक त्रासले आहेत. प्रशासन वारंवार विविध उपाययोजना करत आहे. दरम्यान या परिस्थितीत सर्वात मोठे योगदान हे कोरोना योद्ध्यांचे आहे. त्यांच्यामुळे नागरिक या महामारीत सुखाचा श्वास घेत आहेत.

या परिस्थितीत सध्या कोरोना योद्धे खूप महत्वाची भूमिका निभावत आहेत. दरम्यान कोरोना योद्ध्यांवर जवळपास २०० ते २५० जणांच्या जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर तालुक्यातील साखरी नाटे येथे ही घटना घडली आहे. पोलिस आणि आरोग्य कर्मचारी यांच्यावर जवळपास २०० ते २५० जणांच्या जमावाने हल्ला केल्याची माहिती मिळत आहे.

या हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी आणि एक वैद्यकीय कर्मचारी जखमी झाला आहे. साखरी नाटे या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने सर्व्हेकरता गेलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी तेथील नागरिकांची बाचाबाची झाली.

त्यानंतर पोलिस देखील तेथे दाखल झाले. यावेळी पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचे सांगत साऱ्या परिस्थितीचे गांभीर्य समजून सांगितले. परंतु तेथील जमाव ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

दरम्यान तेथिल २०० ते २५० जणांच्या जमावाने थेट पोलिस तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला. यावेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या गाडीचे नुकसान झाले असून गाडीची काच फुटली आहे.

तसेच यात वैद्यकीय विभाग आणि पोलिसांचा एक कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. दरम्यान घडल्या प्रकाराबाबत जिल्ह्यातून संतप्त प्रतिक्रिया सध्या पुढे येत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.