कारच्या धडकेने रिक्षातील CNG चा भयानक स्फोट, ४ जण जागीच ठार; पहा भयानक व्हिडीओ

कर्जत नेरळ रोडवरील एका भयानक अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. हा भीषण अपघात सोमवारी झाला होता. या अपघातात चार जणांनी जागेवरच आपला जीव गमावला होता. त्यावेळी ही घटना जवळच असलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती.

हा समोर आलेला व्हिडीओ खुप भयानक आहे. रिक्षामध्ये बसलेल्या चार जण जागीच ठार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला होता. डिकसळ येथे ह्युंदाई कार आणि रिक्षाची धडक झाली होती.

कार आणि रिक्षाची इतकी जोरात धडक झाली की रिक्षातील सीएनजी टाकीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की काहीही कळायच्या आत अगदी काही सेकंदात रिक्षाने आणि कारने पेट घेतला.

अचानक झालेल्या या स्फोटाने २ महिला, १ लहान मुलगा आणि १ पुरूष अशा चार जणांनी आपला जीव गमावला आहे. ज्या लोकांनी हा अपघात पाहिला त्यांनी सांगितले की, महामार्गावर जात असताना रिक्षाचालकाने मागे न पाहता युटर्न घेतला.

त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना जोरात धडक दिली. कारच्या धडकेनंतर रिक्षातील सीएनजीचा स्फोट झाला. जर त्यांना लगेच मदत मिळाली असती तर त्यांचा जीव वाचवता आला असता. ही घटना इतकी अचानक घडली की कोणालाही मदतीसाठी पुढे येता आले नाही.

अग्निशमन दलाची गाडी आली होती पण तोपर्यंत खुप उशीर झाला होता. या अपघातात दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. या अपघाताचा पोलिस अधिक तपास करत आहेत. रिक्षावाला हा कल्याणचा होता अशी माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या
“कृपया मुलींनी राहूल गांधींसमोर सरळ उभं राहावं, त्यांनी अजून लग्न केलेलं नाही”
“संजय राऊत यांच्या सारख्या बकबक करणाऱ्यांची वाझे प्रकरणात चौकशी करा”
७० च्या दशकात जुहू बीचवर नग्न अवस्थेत पळाली होती ‘ही’ अभिनेत्री; नाव वाचून थक्क व्हाल
फिल्मी आणि खऱ्या पोलिसांमध्ये जमिन आस्मानचा फरक असतो- उद्धव ठाकरे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.