धक्कादायक! भाजप नेत्याच्या पत्नीवर माकडांचा हल्ला; हल्ल्यात पत्नीचा दुसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू

उत्तर प्रदेश। शहरीभागात विकासाठी व मोठं मोठ्या इमारतीसाठी तसेच कारखाने व उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात जंगलं नष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे मुक्या प्राण्याचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून अनेक ठिकाणी जंगली प्राणी हे रस्त्यांवर किंवा मानव वस्तीत भटकताना दिसत असतात.

तसेच सध्या अनेक ठिकाणी माकडांच्या उच्छादानं नागरिक कंटाळले आहेत. मात्र सध्या एक धक्कादायक घटना समोर येत आहे. उत्तर प्रदेशातील शामली येथील ठिकाणी माकडाच्या हल्ल्यात भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल चौहान यांची पत्नी आणि जिल्हा पंचायतच्या माजी सदस्या सुषमा चौहान यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील शामली येथे देखील माकडांची दहशत पाहायला मिळत असून या हल्ल्यात सुषमा चौहान यांना आपला जीव गमवावा लागला आहे. भाजपचे माजी खासदार दिवंगत बाबू हुकम सिंह यांची पुतणी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल चौहान यांची पत्नी सुषमा देखील राजकारणात सक्रिय होत्या.

प्रभाग क्रमांक 13 मधून त्या जिल्हा पंचायत सदस्या होत्या. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास त्या मंदिरातून परत आल्या. घरी आल्यावर त्यांना घराच्या दुसऱ्या मजल्यावर माकडांचा कळप बसलेला दिसला.

यावेळी कळप पाहून सुषमा त्यांना हकलवण्याचा प्रयत्न करत होत्या मात्र कळप तेथून हटत नव्हता. याचदरम्यान माकडांनी त्यांच्यावर हल्ला केला. या दरम्यान, सुषमा यांचा तोल गेला आणि त्या पायऱ्यांवरून घसरुन थेट सरळ जमिनीवर आदळल्या. व सुषमा चौहान यांचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.

सुषमा खाली पडल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांनी तात्काळ शामली येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. सुषमा यांना रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केलं. सुषमा चौहान यांच्या जाण्यानं सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला व त्यानंतर हजारो लोकांच्या उपस्थितीत मायापूर फार्म हाऊसवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
ऑलिंपिक पदक जिंकल्यानंतर १० पटीने महागडे झाले हे खेळाडू, या ब्रॅन्ड्सकडून आली मोठी मागणी 
पेडणेकर, जाधव, कांबळे, धोत्रे, पाटील हे मराठी नाहीयेत का? भाजपचा राऊतांना सवाल 
बारामतीला रोज नोटा पोहच करेल असा गृहमंत्री शरद पवार शोधतात’ 
जगातील अशी ६ ठिकाणं जिथे कधीच होत नाही अंधार; रात्रीच्या १२ वाजताही चमकत असतो सुर्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.