धक्कादायक! बिग बॉस फेम अनिल थत्ते यांना कोरोनाची लागण

 

मुंबई। राज्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अशात सामान्य जनतेपासून मोठ्या सेलिब्रिटिंना देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा होत असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान बिग बॉस फेम अनिल थत्ते यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. खुद्द थत्ते यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाच्या विळख्यात अडकल्याची माहिती दिली आहे.

फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी मला कोरोना झाला आहे असे सांगितले आहे. “मला कोरोना झाला आहे. गेले दोन महिने साठ दिवस कोरोना होईल या भीतीने मी वर्क फ्रॉम होम करत होतो.

पण व्हायचं तेच झालं. मला कोरोनाची लागण झाली आहे”, असे म्हणत त्यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

थत्ते पुढे म्हणाले की, “कोरोना झाल्यामुळे माझ्या मनात कोरोना विषयी असलेली भीती नष्ट झाली आहे. आता मी कोरोनाच्या आमने-सामने उभा आहे”.

त्याचप्रमाणे कोरोनावर मात केल्यानंतर अनिल थत्ते यांनी प्लाझ्मा देण्याचा निर्णय देखील घेतला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.