धक्कादायक! तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत टवाळखोरांकडून तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न

कल्याण। बहुतेक तरुणी या कुठेही कुटुंबासोबत किंवा आपल्या मित्रांसोबत अनेक ठिकाणी फिरायला जातात. फिरायला जात असताना तरुणींना ज्या कपड्यांमध्ये नीट व सुरक्षित वाटतं ते कपडे घालतात. त्यामुळे बऱ्याच तरुणी या तोकडे व फॅशननुसार कपडे घालतात हे आपण पाहतो.

मात्र अशाच दोन तरुणी आपल्या मित्रांसोबत फिरायला गेले असता टवाळखोर तरूणांकडून तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत कपडे फाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमधील मलंगगड परिसरात घडला आहे. त्यामुळे आता परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रविवारी (1 ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास दोन तरुण आणि दोन तरुणी या मलंगगडच्या पायथ्याशी फिरायला गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी 6 ते 8 टवाळखोर तरुण होते. त्या तरुणांनी सुरुवातीला अश्लील शेरेबाजी केली आणि नंतर तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत या चौघांना बेदम मारहाण केली.

आरोपी इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न करत विनयभंग केला. या सर्व प्रकारामुळे चौघांनी कशी बशी स्वतःची सुटका केली. व त्यानंतर नेवाळी पोलीस चौकी गाठली. तेथे या प्रकाराची तक्रार देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पोलिसांनी त्यांना मेडिकल करून या, इथे तक्रार होणार नाही असे सांगत हिल लाईन पोलीस स्टेशनला जा असं सांगितलं व तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पीडित तरुणीने हिम्मत न हारता सोशल मीडियाचा माध्यमातून घटनेला वाचा फोडली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी (3 ऑगस्ट) संध्याकाळी उशिरा गुन्हा नोंद करत आरोपीचा शोध सुरु केला आहे.

मात्र या घटनेनं संपूर्ण परिसर खळबळाला आहे, व येथील नागरिकांनी तरुणींनी नेमका कोणता पेहराव करावा हे ठरविण्याचा अधिकार टवाळखोरांना कुणी दिला? असा प्रश्न उपस्थित केला आहे. शिवाय त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्यानं पर्यटनस्थळी देखील स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्र घेऊनच जावे लागणार का? हा प्रश्नदेखील विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांची तळीये गावासाठी ११ लाखांची मदत, इतर आमदार कधी जागे होणार?
ब्रेकिंग! ऑलम्पिकच्या भालाफेकमध्ये भारताचा नीरज चोप्रा फायनलमध्ये, सुवर्णपदकाकडे लागल्या सर्वांच्या नजरा
देसी गर्ल प्रियांका चोप्रा अमेरिकेत विकतेय वडापाव, एका वडापावची किंमत ऐकून बसेल धक्का..
“आपल्याच इतकी लोकसंख्या असणाऱ्या चीनची कामगिरी ऑलिम्पिकमध्ये भारतापेक्षा चांगली आहे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.