धक्कादायक! गँगस्टरला पकडायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला, DSP सह ८ पोलीस शहीद

कानपूर | उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. कानपूर पोलिसांवर अज्ञातांनी हल्ला करत गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये डीएसपीसह ८ पोलीस शहीद झाले आहे.

या हल्ल्यात एस.ओ बिथूर यांच्यासह ६ पोलीस गंभीर जखमी आहेत. सर्व जखमी पोलिसांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना उपचारासाठी रीजेंसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हत्या करण्यासाठी आलेले अज्ञातव्यक्ती सतत गोळीबार करत होते. या गोळीबाराला पोलीस दलाले प्रत्युत्तर दिले. त्यामुळे या हल्ल्यात पोलीस चौकी इंचार्ज, एसओ, सीओ यांच्यासह ५ पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत.

विकास दुबे नावाच्या व्यक्तीसह त्याच्या ७ ते ८ साथीदारांनी मिळून पोलिसांच्या पथकावर हल्ला केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या हल्ल्यानंतर त्यांनी पोलीस चौकीतील सर्व साहित्य लुटले. एडीजी कानपूर झोन, आयजी रेंज एसएसपी कानपूर यांच्यासह उत्तर प्रदेशातील पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

या प्रकरणी STF ची मदतही पोलीस दल घेणार आहेत. STF आणि पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे कानपूर शहर हादरून गेले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.