धक्कादायक! दिल्लीत कोविड सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघेही कोरोना पॉझिटिव्ह

दिल्ली ।  दक्षिण दिल्लीतील एका कोविड केअर सेंटरमध्ये १५-१६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीला कोविड केंद्रात दाखल करण्यात आले.

मुलीवर अत्याचार करणारा आरोपीही कोरोना पॉझिटिव्ह आहे. या प्रकरणी दक्षिण दिल्लीचे अतिरिक्त डीसीपी परविंदर सिंग यांनी माहिती दिली.

पीडित मुलगी व आरोपी दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. याबद्दल सध्या केवळ एवढीच माहिती देता येऊ शकते, असे परविंदर सिंग यांनी सांगितले.

कोविड केअर सेंटरमध्ये महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आलेली नाही का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.

कोविड सेंटरमध्ये त्यांना वेगवेगळे ठेवण्यात आले होते. मात्र आरोपी मुलीपर्यंत कसा पोहोचला? तिथे सुरक्षा रक्षक नव्हते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिस शोधत आहेत.

लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पीडित अल्पवयीन मुलीवर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. यानंतर पीडितेला या कोविड केअर सेंटरमधून हलवून केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.