धक्कादायक! पतीचा मोबाईल बंद असल्याने ती निघाली पतीला शोधायला, मात्र दृश्य बघताच पत्नीला बसला जबर धक्का

बहरामपूर। आपण आतापर्यंत अनेक घटना अशा पाहिल्या आहेत, ज्यामुळे अनेकांना जबर धक्का बसतो. मात्र आता अशी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, की एक महिला पती घरी आला नसल्याने त्याला शोधण्यासाठी निघाली व चक्क तिचा पती डॉक्टरांचा मृतदेह एका खोणीत घालून ठेवला असल्याचे समोर आले आहे.

या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव मोहीत नंदा असं आहे . ते आपल्या पत्नी समवेत बहरामपूर येथे राहत होते. मोहीत व्यवसायाने डॉक्टर होते. शहरातील ब्रम्हचारी मंदिराजवळ त्यांचं क्लिनिक होते. दुसरीकडे ते आर्थिक गुंतवणूकही करीत होते.

24 जून च्या सायंकाळी त्यांना उशीर झाला म्हणून बायकोने फोन केला, त्यावेळी त्यांनी ते एका बूट शॉपकडे कर्जाचे हप्ते घेण्यासाठी आले होते असे सांगितले. त्यानंतर खूप वेळ झाला तरी ते घरी परतले नाही व फोनही बंद येत होता. त्यामुळे बायकोची चिंता वाढली व ती शोधण्यासाठी निघाली.

पतीला शोधण्यासाठी ती एका नातेवाईकाला घेऊन क्लिनिकजवळ पोहोचली. तेव्हा पाहिलं तर क्लिनिक सुरू होतं, मात्र डॉक्टर तेथे नव्हते. तेव्हा लकी बूट हाऊसचे मालक लखविंद्र पाल आणि अमन रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे दिसले.

तिने त्यांना डॉक्टरांबाबत विचारलं तर ते काहीही उत्तर न देता बाईकवर बसून निघून गेले. मात्र ते दोघे निघून गेल्यानंतर दुकानाची लाईट सुरूच होती. तेव्हा महिला व सोबत असलेल्या व्यक्तीने शटर ओपन केले. शटर उघटताच दोघांना धक्काच बसला. तेथे डॉक्टरांचा मृतदेह एका खोणीत घालून ठेवला होता. जमिनीवर रक्त पसरलं होतं.

ते पाहताच महिलेला जबर धक्का बसला. पोलिसांना सूचना देताच ते घटनास्थळी हजर झाले. यानंतर आता लकी बूट हाऊसचे मालक लखविंद्र पाल आणि अमन हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला असून दोघेही फरार आहेत. व त्यांचा शोध सुरू आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.