धक्कादायक! पिझ्झामध्ये सापडला काचेचा तुकडा; 8 वर्षाच्या मुलाच्या तोंडातून रक्ताची धार

नवी दिल्ली। हल्ली सर्वच जेवण व वेगवेगळे पदार्थ ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अनेक लोक कामावरून थकून आल्यावर किंवा घरी काही पार्टी असेल तसेच आपल्याला किंवा आपल्या मुलांना काही वेगळं खावंस वाटलं तर आपण लगेच मोबाईवरून आपल्याला पाहिजे ते ऑर्डर करतो.

त्यात अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत पिझ्झा, बर्गर, पास्ता यांसारख्या पदार्थांची जरी नावं घेतली तरी तोंडाला पाणी सुटतं व ते पदार्थ खावेसे वाटतात. मात्र पिझ्झा खाल्याने एका 8 वर्षीय मुलांसोबाबत विचित्र प्रकार घडला आहे. व तो प्रकार ऐकून मुलाच्या आईसह सर्वच हैराण झाले आहे. नक्की घटना काय आहे पाहुयात.

मिळालेल्या माहितीनुसार जेस पामर नावाच्या एका महिलेनं रविवारी संध्याकाळी जेवणाच्या आधी आपला मुलगा स्टेनली याच्यासाठी पिझ्झा मागवला होता. पिझ्झा खात असताना या मुलाच्या तोंडात काहीतरी टोचल्याचं त्यानं सांगितलं. यानंतर या मुलाच्या तोंडातून काच किंवा प्लास्टिकचा एक टोकदार तुकडा निघाला. या टोकदार तुकड्यामुळं मुलाचा ओठ कापला गेला व रक्त येऊ लागलं व या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे.

जेस पामर यांनी सांगितले की, पिझ्झा कंपनी असदा यांच्या वागणुकीमुळे त्या नाराज आहेत आणि पिझ्झा कंपनीनं त्यांना असं सांगितलं आहे, की ते याचा तपास करू शकत नाहीत, कारण याचं पॅकेजिंग त्यांनी केलेलं नव्हतं. मात्र महिलेच्या म्हणण्यानुसार की ज्याला कोणाला या पिझ्झाचा भाग मिळाला आहे, त्यानं आतापर्यंत तो खाल्लाही असेल आणि ही अतिशय गंभीर बाब आहे.

पिझ्झा कंपनी असदानं यासाठी माफी मागितली आहे. पामर यांनी सांगितले की, त्यांनी अनेकदा असदाकडून पिझ्झा खरेदी केला आहे मात्र यावेळी पिझ्झा खाल्यावर मुलाच्या तोंडातून काच किंवा प्लास्टिकचा एक टोकदार तुकडा निघाला. हा तुकडा काचेचा होता, की प्लास्टिकचा याबाबत मी खात्रीनं सांगू शकत नाही, मात्र, माझ्या मुलाच्या जबड्यातून मोठ्या प्रमाणात रक्त येत होतं.

हा तुकडा मला काचेप्रमाणे वाटला असं त्या म्हणाल्या. ही घटना घडल्यानंतर अनेकांनी विकत घेतलेली कोणतीही वस्तू तपासून पाहण्याचा सल्ला कमेंट्स करत दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
ब्रेकिंग! आत्महत्येपूर्वी पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यात झाला होता दीड तास संवाद, राज्यात खळबळ
नितेश राणेंनी जाहीर केली शिवसेनेतील बाटग्यांची यादी; नावे वाचून धक्का बसेल
ही गाडी घालणार मार्केटमध्ये धुमाकूळ, केवळ 8 मिनिटांत चार्ज, रेंजचे तोडले सर्व विक्रम, वाचा..
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आजपासून नवा सातबारा, जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.