धक्कादायक ! जगातून १४ कोटी तर भारतातून दरवर्षी गायब होतात ४.६ कोटी मुली

दिल्ली | भारत सरकार बेटी बचाओ, बेटी पाढाओचा नारा देते. महिला सुरक्षा, आणि महिला सशक्तीकरण याबाबत वर्षानुवर्षे चर्चा सुरू आहे. मुलींना शाळेत घाला असा आग्रह देखील केला जातो.

मात्र असे असले तरी भारतात स्थिती वेगळी आहे. स्कुपवुपच्या वृत्तानुसार, युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडने २०२० स्टेट वर्ल्ड पॉप्युलेशनचा रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टनुसार जगभरात १४.२ कोटी आणि भारतात ४.६ कोटी मुली गायब होतात.

भारतातील लैंगिक भेदभावामुळे असं होतं असल्याचं सांगण्यात आलं आहे. UNFPA नुसार जन्माआधी लिंग परीक्षण केल्यामुळे ३ पैकी २ मुली गायब होतात. तर जन्मानंतर ३ पैकी १ मुलीचा मृत्यू होतो.

गायब झालेल्या ९० टक्के मुलींमधील ५० टक्के मुली ह्या चीनमधील आहेत आणि ४० टक्के मुली ह्या भारतातील आहेत. भारताच्या सँपल रजिस्ट्रेशन सिस्टम स्टॅटिस्टिकल रिपोर्ट २०१६ ते १८ नुसार लिंग प्रमाण हे १०० मुलांमागे ८९९ मुली इतके आहे.

भारतात फक्त मुलींची हत्या होत नाही तर बालविवाहाचे प्रमाण देखील ४ मुलींमागे १ आहे. म्हणजे प्रत्येक ४ मुलींमागे एका मुलीचा विवाह हा १८ वर्षांखाली होतो.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.