Share

UP News: साहेब! माझ्या बाळाला परत द्या, मृत नवजाताला पिशवीत घेऊन वडिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव, अधिकारीही थरारले

UP News: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri district) येथे मानवी संवेदनांना काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. भानपूर (Bhanpur village) गावातील रहिवासी विपिन गुप्ता (Vipin Gupta father) यांनी पत्नीला प्रसूतीसाठी महेवागंज (Mahewaganj town) येथील गोलदार हॉस्पिटल (Goldar Hospital) मध्ये दाखल केले होते. मात्र पैशांच्या हव्यासापोटी रुग्णालय प्रशासनाने उपचार नाकारले आणि शेवटी एका निरपराध नवजात बाळाला आपला जीव गमवावा लागला.

पैशासाठी उपचार नाकारले

गर्भवतीला दाखल करताना नॉर्मल डिलिव्हरीसाठी १० हजार, लहान शस्त्रक्रियेसाठी १२ हजार आणि मोठ्या शस्त्रक्रियेसाठी तब्बल २५ हजार रुपये मागण्यात आले. पण कुटुंबीयांकडे केवळ ८ हजार रुपयेच जमा होते. उर्वरित रक्कम नसल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रसूतीची वेळ जवळ आली असतानाही तिला बाहेर काढण्याचा अमानुष निर्णय घेतला.

स्ट्रेचरवर टाकून बाहेर हाकललं

चार परिचारिकांनी प्रसूतीच्या तीव्र वेदनांनी विव्हळत असलेल्या महिलेचा स्ट्रेचरवरून उचलून रुग्णालयाबाहेर टाकला. हवालदिल झालेल्या कुटुंबीयांनी तिला तातडीने दुसऱ्या रुग्णालयात नेलं. मात्र वेळ निघून गेल्याने शस्त्रक्रियेदरम्यान बाळाचा मृत्यू झाला.

मृत बाळाची पिशवी घेऊन डीएम ऑफिसात वडील

या घटनेने हादरलेले वडील विपिन गुप्ता यांनी मृत बाळाला पिशवीत ठेवलं आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. “साहेब, माझ्या बाळाला जिवंत करा, माझी पत्नी सतत बाळाबद्दल विचारते, मी तिला खोटं सांगत आहे,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांकडे हृदयद्रावक विनवणी केली. हा प्रसंग पाहून जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारीही स्तब्ध झाले.

रुग्णालय सील, कारवाईची मागणी

जिल्हाधिकारी आदेशानंतर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष गुप्ता (Dr. Santosh Gupta CMO) आणि उपविभागीय अधिकारी अश्विनी कुमार सिंह (Ashwini Kumar Singh SDM) यांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशी केल्यानंतर गोलदार हॉस्पिटल सील करण्यात आले, तसेच तिथल्या इतर रुग्णांना जिल्हा महिला रुग्णालयात हलवण्यात आले.

स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप असून संबंधित डॉक्टरांवर भ्रूणहत्या आणि रुग्णाच्या जीवाशी खेळल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. पैशाच्या हव्यासाने एका निरपराध जीवाचा बळी गेला असून, अशा रुग्णालयांवर प्रशासनाने कठोर नियंत्रण ठेवावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now