Share

Pakistan : ‘वर्ल्कपमध्ये बड्या बड्या संघांना जे जमलं नाही, तो पराक्रम पाकिस्तानी संघाने करुन दाखवला’

pakistan

shoaib akhtar shocking statement on pakistan win  | सध्या टी २० वर्ल्डकप सुरु आहे. त्यामध्ये गुरुवारी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना झाला. हा सामना पाकिस्तानने जिंकला आहे. सिडनी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ८ विकेट्स गमावून १८६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाला दिलेले लक्ष्य गाठण्यात अपयश आले. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तान ३४ धावांनी विजयी झाला. त्यामुळे पाकिस्तानचीही सेमी फायनलमध्ये येण्याची शक्यता वाढली आहे.

पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमद आणि शादाब खान यांनी अर्धशतकीय खेळी केली आहे. तसेच पाकिस्तानच्या गोलंदाजांपुढे आफ्रिकेच्या फलंदाजांना गुडघे टेकावे लागले आहे. ही कामगिरी पाहून पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब अख्तर मात्र खुपच खुश झाला आहे.

पाकिस्तानने आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी केल्यामुळे शोएब अख्तरने पाकिस्तानच्या संघाचे कौतूक केले आहे. तो म्हणाला, आमच्या खेळाडूंनी खुप चांगली कामगिरी केली आहे. पाकिस्तानच्या संघाने आफ्रिकेविरुद्ध अशी कामगिरी केली आहे. जे इतर कोणत्याही संघाला करता आली नाही. यावेळी त्याने अप्रत्यक्षपणे भारताला टोला लगावला आहे. कारण भारत आणि आफ्रिकेच्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता.

तो म्हणाला की, आज आमच्या खेळाडूंनी प्रभावी कामगिरी केली आहे. जेव्हा मला ते चुकीचे सिद्ध करतात तेव्हा मला ते आवडते. इतर कोणत्याही संघाला जे करता आलं नाही, ते पाकिस्तानच्या संघाने करुन दाखवलं आहे. पाकिस्तानच्या संघात आता बदल होतोय.

दरम्यान, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेसमोर पाकिस्तानने १८६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण पावसामुळे ते १४२ धावांचे झाले. पण आफ्रिकेच्या संघाला फक्त १०८ धावाच करता आल्या. त्यामुळे आफ्रिकेच्या संघाने हा सामना गमावला.

महत्वाच्या बातम्या-
Buldhana : पत्नीला कार शिकवणे शिक्षकाला पडले महागात, कार ७० फुट विहीरीत कोसळून दोघांचा मृत्यू
Indian Team : पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेंशन वाढलं, सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी उरलाय फक्त ‘हा’ एकमेव मार्ग
Team India : ‘हे’ पाच खेळाडू ठरलेत टीम इंडियाच्या विजयाचे हिरो; भन्नाट खेळी खेळत राखली संघाची लाज

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now