गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक, घरीच उपचार सुरू

श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे , मात्र त्यांनी मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका, असे त्यांनी सांगितले आहे. यामुळे सर्वांना चिंता लागली आहे.

यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहे. शिवशंकरभाऊ यांना घरीच डॉ. हरीश सराफ यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. शिवशंकरभाऊ यांच्यावर त्यांच्या राहत्या घरीच पूर्ण मेडिकल सेटपसहीत उपचार सुरू आहेत.

त्यांचा रक्तदाब कमी झालेला असून त्यांना कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. शिवशंकरभाऊंनी आयुष्यभर आयुर्वेदिक उपचारालाच प्राधान्य दिल्यामुळे त्यांच्या प्रकृतीसंदर्भात बुलढाणा येथील आयुर्वेदतज्ञ डॉ. गजानन पडघान यांनाही तिथे बोलविण्यात आल्याची माहिती आहे.

त्यांचे भक्त देखील आता प्रार्थना करत असून ते लवकरात लवकर बरे व्हावेत, याची प्रार्थना केली जात आहे. असे असताना ते लवकरच बरे होतील, असेही सांगण्यात येत आहे. त्यांना दवाखान्यात हलवले जाणार नसल्याचे देखील सांगितले जात आहे.

दरम्यान, समाज माध्यमांवर शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. यासंदर्भात हा संदेश चुकीचा असून, अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. भाविकांनी पॅनिक होवू नये, असे आवाहन त्यांच्या स्वकीयांकडून सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

हिला लाजवाटली पाहिजे; गरजू व्यक्तीची मदत करणारी रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर झाली ट्रोल; पहा व्हिडिओ

पुण्याच्या वेदीकाचा मृत्यूच्या काही तासांपूर्वीचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर, पहा हृदय पिळवून टाकणारा व्हिडिओ…

VIDEO: भरमंडपात ढसाढसा रडायला लागली नवरी; नवरदेवाने सगळ्यांसमोर किस करत केलं गप्प

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.