कोकणात पुन्हा एकदा शिवसेनेने मारली बाजी; राणेंचा दारूण पराभव करत केला सुपडा साफ

रत्नागिरी । कोकणात नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद दिल्यानंतर कोकणात भाजपची ताकद वाढेल असे म्हटले जात होते. मात्र तसे काही दिसून येत नाही. नुकत्याच झालेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकालात शिवसेना व राष्ट्रवादीच्या पँनलने मोठा विजय मिळविला आहे.

यामुळे नारायण राणे यांना मोठा धक्का मानला जात आहे. निलेश राणे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यामध्ये एकुण २१ जागांपैकी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सहकार पॅनलने १८ जागा मिळवल्या आहेत. यामुळे आगामी काळात देखील असेच चिन्ह राहण्याची शक्यता आहे.

या प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडे अवघ्या कोकणाचे लक्षं लागले होते. त्यांचे निकाल जाहीर करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर, शिवसेना नेते उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पँनलने वर्चस्व निर्माण केले आहे. त्यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे.

या निवडणुकीत निलेश राणे यांच्या पँनलचा सुपडा साफ झाला. निलेश राणे यांच्या समर्थकांना अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आणखी एका प्रतिष्ठेच्या निवडणुकीत निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांना दारूण पराभव झाला आहे. राणेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, विजयानंतर विजयी उमेदवारांनी जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली. राणे समर्थकांचा मात्र हिरमोड झाला असून आगामी निवडणूकीतील निकाल देखील असेच असतील, असे शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यापासून कोकणात राणे आणि शिवसेना हा संघर्ष बघायला मिळाला आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा पराभव मात्र एक मोठा धक्का मानला जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.