Shivsena : शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न निर्माण झाला असताना निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले. तसेच दोन्ही गटांना दोन नवीन नाव आणि चिन्ह दिले.
यावेळी ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आले. तसेच शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव आणि ‘ढाल तलवार’ हे चिन्ह देण्यात आले. मात्र, आता पुणे जिल्ह्यातील मंचर इथून एक वेगळीच घटना समोर आली आहे.
मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गटाने मशाल रॅली काढली होती. किल्ले शिवनेरी ते मातोश्री असे या रॅलीचे स्वरूप होते. ही मशाल रॅली पुणे जिल्ह्यातील मंचर येथे पोहोचल्यानंतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळून आलेला पाहायला मिळाला.
मंचर येथे मशाल रॅली आली असताना तिचे स्वागत करण्यावरून माजी सरपंच दत्ता गांजाळे आणि पंचायत समितीचे माजी सदस्य राजाराम बाणखेले यांच्यात शाब्दिक वाद झाले. पुढे या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले.
यावेळी दोघांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. त्यानंतर जिल्हा संघटक ऍड. अविनाश राहणे, तालुकाप्रमुख दिलीप पवळे आणि तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी हा वाद सोडवला. परंतु, आता ही घटना सर्वत्र पसरली असून संपूर्ण तालुक्यात याची चर्चा आहे.
यावेळी दत्ता गांजाळे हे मशाल हाती घेण्यासाठी आले असताना बाणखेले यांनी त्यांना विरोध केला. दत्ता गांजाळे हे शिंदे गटाचे असून ते रुबाब करण्यासाठी स्वागताला आले असल्याचा आरोप बाणखेले यांनी केला. त्यांनतर दत्ता गांजाळे यांनी हा आरोप फेटाळून लावत मी शिंदे गटात गेलोच नाही असे ते म्हणाले. तसेच बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नेहमी अनुद्गार काढणाऱ्यांनी मला पक्षनिष्ठा शिकवू नये असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
NCP : अंथरुणाला खिळून असतानाही १७ वर्षे पक्षसेवा करणारा राष्ट्रवादीचा योद्धा हरपला, शेवटी अजितदादांचा डिपी लावला अन्..
Eknath Shinde : …म्हणून आम्हाला भाजपासोबत सरकार स्थापन करण्यासाठी वेळ लागला; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा
Shinde group : सत्तांतरानंतर शिंदे गटातील नाराजी नाट्य सुरुच, नाराज दिलीप लांडे म्हणाले आम्ही काय फक्त…
Eknath Shinde : धनुष्यबाण आम्हालाच मिळणार कारण निवडणूक आयोगाने हा निर्णय…; एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य






