सुनेवर थुंकल्याचा शिवसेना नेत्याचा व्हिडीओ, भाजपने घरगुती वादाचा फायदा घेऊ नये; सेना नेत्याची विनंती

कोरोनाचा प्रसार जरी मोठ्या प्रमाणावर होत असला तरी राजकारण पण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून आले आहे. कल्याण ग्रामीणचे माजी शिवसेना प्रमुख एकनाथ पाटील यांची पण एक कौटुंबिक घटना समोर आली आहे.

या घटनेचा व्हिडीओ पण समोर आला आहे. त्यांची सून हर्षदा पाटील यांनी पोलीस उपायुक्तांनी पण भेट घेतली आहे. त्यांनी यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. यावर भाजपच्या चित्रा वाघ यांनी पण आक्रमक पवित्रा घेतला आहे.

कल्याण ग्रामीण परिसरात एकनाथ पाटील राहतात. सासरे वारंवार त्रास देतात, मारहाण करतात आणि छळ पण करतात. इतकेच नाही तर नातीवर अन धावून गेले आहेत. एकनाथ हे हर्षदा यांच्या अंगावर थुकल्याचा आरोप केला आहे.

त्यांनी याच्या पुराव्यादाखल एक व्हिडीओ पण शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ सासरे अंगावर थुकल्याचे दिसून आले आहे. त्यांनी यासंदर्भात शिवसेना नेत्यांना पण सांगण्याचा प्रयत्न केला.

पण त्यांचे म्हणणे कोणीही ऐकून घेतले नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. हर्षदा पाटील यांनी पाठविलेल्या व्हिडिओची सत्यता पडताळून पहिली जाईल असे डॉ पाटील यांनी म्हटले आहे.

चित्रा वाघ यांनी पण यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये. पोलिसांनी दोषी असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी असेही त्यांनी यायला म्हटले आहे. तो व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या
मोठी बातमी! राज्यात पुढचे १५ दिवस लॉकडाऊन वाढवला; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

…म्हणून सलमानच्या राधेमध्ये छोटीशी भुमिका साकारली; चाहत्यांच्या टिकेनंतर प्रविण तरडेंचा खुलासा

मुंबईतील हॉटेलवर महापौरांनी टाकली धाड; हॉटेलने लसींसोबत आराम करण्याची दिली होती ऑफर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.