‘एकटेच लढणार अन् जिंकणार ही चंद्रकांत पाटलांची खुमखुमी चांगलीच जिरली’

मुंबई | पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला अनेक ठिकाणी चीतपट केले होते. यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला धक्का देत प्रचंड यश मिळवले आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. ‘आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. ते खरे आहे, पण आम्ही सर्वशक्तिमान आहोत व एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली,’ असा टोला शिवसेनेने मारला आहे.

‘महाविकास आघाडीचे सरकार तीनचाकी आहे, अशी टीका विरोधक वर्षभर करीत होते. यावर ”सरकारला चाके चारच आहेत, चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे आहे,” असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हाणला होता. तो विश्वास स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकांनी खरा ठरवला, असे सामना अग्रलेखातून म्हंटले आहे.

महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक आहे, त्यांना जनतेचा पाठिंबा नाही असे बोलणाऱ्यांनी शिक्षक-पदवीधरांनी दिलेल्या निकालाकडे जाड भिंगाचा चष्मा लावून पाहावे, अशा तिखट शब्दात आज सामनामधून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

दरम्यान, ‘वर्षभरापूर्वी १०५ आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल,’ असे सेनेने म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘महाविकास आघाडीची ताकद ओळखण्यास कमी पडलो’, देवेंद्र फडणवीस झाले चीतपट
‘आईचा अपमान सहन करणार नाही, जाहीर माफी माग’, कंगनाला भाजपने सुनावले
शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्या कंगणावर भडकला दिलजीत दोसांज, म्हणाला..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.