काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. या कारवाईत ईडीने खासदार संजय राऊत यांची अलिबाग(Alibagh) मधील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केलं होतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.यादरम्यान संजय राऊत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.(shivsena sanjay raut viral video)
या व्हिडिओमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर भाष्य करत आहेत. “केंद्रीय तपास यंत्रणांना निःपक्षपातीपणे काम करू देणे गरजेचे आहे. उद्या माझ्यावर जरी अशा प्रकारचा आरोप झाला तर माझी सुद्धा चौकशी झाली पाहिजे”, असे शिवसेना खासदार संजय राऊत व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत.
भाजपच्या एका कार्यकर्त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ बऱ्याच दिवसांपूर्वीचा आहे. हा व्हिडिओ सागर शिंदे या भाजप कार्यकर्त्याने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला आहे. सागर शिंदे हे भाजप पक्षाचे मावळ मतदारसंघाचे सोशल मीडिया अध्यक्ष आहेत.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सागर शिंदे यांनी लिहिले आहे की, “अथक प्रयत्नातून शेवटी सापडला बघा व्हिडिओ.” या व्हिडिओसोबत भाजप कार्यकर्ता सागर शिंदे यांनी हसण्याचा ईमोजी देखील शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
या व्हायरल व्हिडिओमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईचे समर्थन केलं आहे. या व्हिडिओमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “ईडी, सीबीआय आपापल्या पद्धतीने त्यांचं काम करत असतात आणि त्यांना ते काम करू दिलं पाहिजे. सरकारी यंत्रणांनावर राजिक्य दृष्टीनं पाहणं आणि बोलणं मला योग्य वाटतं नाही.”
https://www.facebook.com/watch/?v=1591901287854497
शिवसेना खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, “या देशात लोकशाही अजूनही आहे. मला देशभरातील अनेक केसेस माहित आहेत. ज्यामध्ये लोक तपास यंत्रणानासमोर हजर होतात आणि तपास यंत्रणा त्यांची चौकशी करते. अजूनही आपल्या तपास यंत्रणेवरती एक चांगला संस्कार आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना निःपक्षपातीपणे काम करू देणे गरजेचे आहे. उद्या माझ्यावर जरी अशा प्रकारचा आरोप झाला तर माझी सुद्धा चौकशी झाली पाहिजे”, असे संजय राऊत यांनी त्या व्हायरल व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
३६ रुपयांचा शेअर पोहोचला ६७१ रुपयांवर, १ लाखाचे झाले तब्बल १८ लाख, तुमच्याकडे आहे का हा शेअर?
जेव्हा सलमान खानने आपल्या बालपणीच्या प्रेमाबद्दल केला खुलासा, म्हणाला, जर तिच्याशी लग्न केले असते तर..
”विराट कोहली, बाबर आझम आणि नऊ लाकडाचे तुकडे द्या, याच्यातच वर्ल्ड कप जिंकून दाखवेन”