मंगळवारी शिवसेनेचे(Shivsena) खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मोठे गौप्यस्फोट केले होते. या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. भाजपाचे(BJP) किरीट सोमय्या ईडीचे दलाल आहेत. हा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो की कुणाच्या घरावर धाडी पडणार, अशी टीका संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केली होती.(shivsena sanjay raut new tweet on somiyya)
आज पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले आहे. “बाप बेटे जेलमध्ये जाणार! वाट पहा आणि बघत राहा. कोठडीचे सॅनिटायझेशन सुरु आहे”, असे खासदार संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.
पीएमसी बँकेतील आरोपी राकेश वाधवानचा भाजपशी थेट आर्थिक संबंध आहे. राकेश वाधवान आणि किरीट सोमय्यांचा मुलगा बिझनेस पार्टनर आहेत. किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या याची ‘निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी’ आहे. ही कंपनी वसईतील गोखिवरे येथे मोठा प्रकल्प राबवत आहे. किरीट सोमय्यांच्या मुलाचा पीएमसी बँकेतील घोटाळ्याशी संबंध आहे”, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
https://twitter.com/rautsanjay61/status/1493782014150860801?t=rWDvpp03jaG9P3UUYt9aEQ&s=19
या पत्रकार परिषदेत संजय राऊत पुढे म्हणाले की, देवेंद्र लडानीच्या नावे ४०० कोटींची जमीन भाजप नेते किरीट सोमय्यांनी ४.५ कोटी रुपयांत विकत घेतली. किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागिदार आहेत. तसेच किरीट सोमय्यांनी राकेश वाधवानकडून १०० कोटी रुपये वसूल केले आहेत”, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
“भाजप नेते किरीट सोमय्यांच्या प्रकल्पाला पर्यावरण विभागाची परवानगी नाही. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी”, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली. किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाला पोलिसांनी अटक करावी, असे देखील संजय राऊत म्हणाले.
काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्यांनी शिवसेनेचे नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. यावेळी सोमय्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला होता. अनिल परब आणि संजय राऊत यांना लवकरच तुरुंगात जावे लागणार आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :-
महाविकास आघाडी सरकारमध्ये बदल होणार, नाना पटोलेंच्या विधानामुळे राजकारणात खळबळ
तब्बल ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती मागे सोडून गेले बप्पी लहरी, सोन्याप्रमाणे महागड्या गाड्यांचीही होती आवड
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरेंनी ‘या’ बड्या नेत्याला केला फोन, राजकीय वर्तुळात खळबळ