‘मोदी सरकार म्हणजे खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा…’

मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा…’ असा घणाघात केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर केला आहे.

ते म्हणाले, ‘केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटीचे पैसे लवकरात लवकर द्यावेत. म्हणजे आम्हाला कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था बाहेर काढता येईल. तसेच कोरोनाची लस मोफत देण्यासंदर्भातही विचार झाला पाहिजे,’ असे राऊत म्हणाले.

तसेच ‘मोदी सरकारकडून मांडल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात गरीब आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारी घोषणा झाली पाहिजे. गरीब आणखी गरीब होता कामा नये,’ अशी मागणीही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केली आहे.

दरम्यान, ‘महाराष्ट्राने देशाला सातत्याने देण्याची दानत दाखवली, पण महाराष्ट्रावर कायम अन्याय झालाय. महाराष्ट्र देशाचं पोट भरतो, पण महाराष्ट्राच्या पोटाकडे सरकार पाहत नाहीत. सध्या, आकड्यात पडायचं नाही, किती खरे-किती खोटे हे सहा महिन्यांनी कळतं,’ असा टोला देखील त्यांनी मारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
…म्हणून विरुष्काच्या लेकीचं नाव आहे खास; जाणून घ्या या नावामागचा अर्थ
पाच तारखेलाच पगार झाला पाहिजे म्हणणाऱ्या शिक्षकांना अजित पवारांनी ‘या’ शब्दांत खडसावले
अर्थसंकल्पावर राहुल गांधींनी केली जोरदार टीका, ‘देशाची संपत्ती गरीकांच्या हातात नसून…’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.