सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत होणारा घोडेबाजार थांबविण्यासाठी शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबवले आहे. (shivsena reject vidhan parishd ticket subhash desai )
त्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुका देखील जवळ आल्या आहेत. येत्या २० जूनला विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. राजकीय पक्षांकडून विधान परिषदेसाठी कोणकोणत्या उमेदवाराला संधी मिळणार? याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.
राष्ट्रवादी पक्षाकडून विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तसेच शिवसेना पक्षाकडून दोन उमेदवारांना विधान परिषदेसाठी तिकीट देण्यात आलं आहे. त्यातील एक तिकीट सचिन अहिर यांना देण्यात आलं आहे. तर दुसऱ्या तिकिटासाठी एका नवीन उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.
शिवसेनेने विधान परिषदेच्या दुसऱ्या जागेसाठी आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या जागी आमशा पाडवी यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना मोठा धक्का बसला आहे. आमशा पाडवी यांच्या निवडीची राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगू लागली आहे.
तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळी मतदार संघ सोडणाऱ्या सचिन अहिर यांना देखील विधान परिषदेसाठी संधी देण्यात आली आहे. सचिन अहिर यांना शिवसेनेकडून विधान परिषदेचे तिकीट देण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या उमेदवारीसाठी आमशा पाडवी यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी शिवसेनेने राज्यसभेसाठी कोल्हापूरचे शिवसैनिक संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. आता पुन्हा एकदा शिवसेनेने सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे.
आमशा पाडवी हे कट्टर शिवसैनिक आहेत. ते सध्या नंदुरबार जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आमशा पाडवी शिवसेनेसाठी काम करत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागात शिवसेनेचे कार्यकर्ते उभे करण्याचे काम आमशा पाडवी यांनी केलं आहे.
२०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी अक्कलकुवा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. त्यांच्यासमोर आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांचे मोठे आव्हान होते. २०१४ आणि २०१९ या दोन्ही विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. विधान परिषदेचे तिकीट मिळाल्यानंतर आमशा पाडवी यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
“मी शिवसेनेत सुरवातीपासून काम करत आहे. त्याची आज कदर झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज मला तिकीट दिलं. हे माझं भाग्यच आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला फोन करून यासंदर्भातील माहिती दिली. आज मी मुंबईत उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आलो आहे.”, असे शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
शिवसेनेचा पुन्हा एकदा सामान्य शिवसैनिकावर विश्वास, विधानपरिषदेसाठी संधी दिलेले पाडवी आहेत तरी कोण? जाणून घ्या..
दृष्टी गेली तरी मानली नाही हार, UPSC मध्ये पटकावला ७ वा क्रमांक, आईने आणि मित्राने लिहीला पेपर
…तर सिद्धू मुसेवाला आज जिवंत असता; प्रत्यक्षदर्शी मित्राने सांगितला हत्येचा संपूर्ण घटनाक्रम