शिवसेना भवनासमोर आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला चोपणारा शिवसैनिक कोण माहितीये का? जाणून घ्या..

अयोध्येतील श्रीराम मंदीर बांधण्यासाठी भुसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने शिवसेनेविरोधात थेट शिवसेनाभवनावर मोर्चा काढला होता. हा मोर्चा भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.

या मोर्चावेळी भाजप-शिवसेना नेते आमने सामने आल्याने परीसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबाड हाणामारी झाली आहे. पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना रोखल्यानंतर शिवसैनिकांनी तिकडे धाव घेतली त्यामुळे अजून मारहाण झाली.

या हाणामारीची दृश्ये कॅमेऱ्यामध्ये पण कैद झाली होती. त्या व्हिडिओमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी राकेश देशमुख भाजप कार्यकर्त्याला चोप देताना दिसून येत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये राकेश देशमुख भाजप कार्यकर्त्याला कानशिलात लगावताना आणि पोटात मारताना दिसत आहे. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन राकेश देशमुख यांचा फोटो शेअर केला आहे. तसेच शिवसैनिकांचा अभिमान आहे, असे म्हटले आहे.

तसेच शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांनीही राकेश देशमुख यांचा फोटो शेअर केला आहे आणि त्या फोटोला अभिमान आहे, असे कॅप्शन दिले आहे. आता भाजपने देखील या घटनेचा बदला घेण्याचा निर्धार केला आहे.

दरम्यान, आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आता पुढे काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘लगान’ चित्रपटातील गोरी मॅम आज दिसते ‘अशी’; पहा फोटो
कॅन्सर पिडीत व्यक्तीने भावूक होत धरले थेट सोनू सुदचे पाय, मग सोनूने काय केले पहाच
काय सांगता! शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलीचे शिक्षकावरच जडले प्रेम, लग्न करून गाठले पोलीस स्टेशन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.