शिवसेना नाव आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. या सर्व गोष्टींमुळे राज्याचे राजकीय वातावरण सुद्धा तापले आहे. चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर शिंदे गट शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेत आहे.
अशात राज्यात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. शिवसेनेची वास्तू कोणाला मिळणार आणि चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर शिंदे गट त्यावर दावा सांगणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवसेनेची कार्यालयं, मालमत्ता या सर्वांची कशी विभागणी होणार यावर सध्या चर्चा होत आहे.
काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. त्यांनी भाजपशी हात मिळवणी करत नवीन सरकार स्थापन केलं. तसेच मुख्यमंत्रिपदही मिळवलं. शिंदेंकडे ठाकरेंपेक्षा जास्त आमदार खासदार असल्यामुळे त्यांनी शिवसेना नाव आणि चिन्हावरही दावा ठोकला.
अशात निवडणूक आयोगाने यावर निकाल देताना शिंदेंच्या बाजूने दिला. मंगळवारी शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. त्यामुळे ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. आता सर्वच काही गेल्यामुळे पक्षाची संपत्तीही त्यांच्याकडे जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर आता शिवसेनेची सर्व कार्यालयं आणि शिवसेना भवन हे शिंदेंकडे जाणार अशी चर्चा आहे. पण एकनाथ शिंदे यांनी आम्ही मालमत्तेवर दावा करणार नाही, असे वक्तव्य जाहीरपणे केले होते. त्यामुळे आता पुढे नक्की काय होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षाकडे १९१ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तसेच मुंबईमध्ये २८० शाखा आहेत. तसेच राज्यातील विविध शहरांमध्ये तब्बल ८२ शाखा आणि कार्यालये आहेत. एकनाथ शिंदेंनी जरी मालमत्ता नको असे म्हटले असले तरी ते आता शिवसेना प्रमुख बनले आहे. त्यामुळे त्यानी जर खजिनदाराची नियुक्ती केली तर संपुर्ण मालमत्ता आणि निधी आपोआपच शिंदे गटाला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
मनसेच्या एकमेव आमदारने पक्षावर दावा ठोकला तर काय कराल? राज ठाकरे म्हणाले…
कोर्टातील लढाई सुरू असतानाच इंदुरीकर महाराजांनी ठाकरे आणि शिंदेंना केले खास आवाहन, म्हणाले…
इतिहासाशी छेडछाड चुकीची! औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावर संतापले ओवेसी; म्हणाले..