‘मुख्यमंत्री वाजत गाजत येणारच, हिंमत असेल तर रोखा’, शिवसेनेचे राणेंना खुले आव्हान

मुंबई । भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद काही केल्यास कमी होताना दिसत नाही. आता कोकणातील चिपी विमानतळाच्या श्रेयवादावरून वाद निर्माण झाला आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या श्रेयवादावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. मात्र यावरून शिवसेना आणि भाजप आमने सामने आल्याचे बघायला मिळत आहे.

नारायण राणे यांनी या उद्घाटनाला उद्धव ठाकरे यांना बोलावण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे, यावरून वाद निर्माण झाला आहे. यावरच शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या वाजत गाजत येणारच, हिमंत असेल तर रोखून दाखवा. असे आव्हान त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिले आहे.

यामुळे आता मुख्यमंत्री येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिंधुदुर्गमधील या विमानतळाचे उद्घाटन ९ आक्टोबरला होणार आहे. असे असताना आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंना प्रतिउत्तर देत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करुन उद्घाटनाची वेळ ठरवल्याचे सांगितले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनीच नारायण राणे यांना याबाबत माहिती दिली नसल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदें यांच्यात चर्चा झाली. यावेळी चिप्पी विमानतळाच्या उद्घाटनाचा दिवस ठरला. दोघांनी चर्चा करून दिवस ठरवला. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी बोलणे झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी मला १२ वाजता फोन करून सांगितले की, आम्ही ९ तारीख फिक्स केली आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हा उद्घाटन सोहळा रखडला आहे. आता त्याला मुहूर्त लागला असला तरी यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. यातच गेल्या काही दिवसांपूर्वी राणे यांना अटक करण्यात आली होती. यामुळे वातावरण आधीच तापले आहे.

यामुळे शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये राज्यात राडा झाला होता. यामुळे आता पुढे काय होणार, मुख्यमंत्री जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते यामुळे आक्रमक झाले आहेत.

ताज्या बातम्या

विमानतळ उद्घाटनासाठी ज्योतिरादित्य शिंदेंचा ठाकरेंना फोन; राणेंचा जाहीर अपमान करत जागा दाखवली

उपचारासाठी पत्नीला खांद्यावर घेऊन पायी निघाला, पतीच्या खांद्यावर पत्नीचा करुण अंत झाला..

पैसा जवळ टिकत नाही? जाणून घ्या, तज्ञांच्या मते पैसे वाचवण्याचे सोपे मार्ग…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.