शिवसेनेची मोठी घोषणा! उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकीत सर्वच्या सर्व जागा लढणार

उत्तर प्रदेशात पुढील वर्षात विधानसभाच्या निवडणूका होणार आहे. आता या निवडणूकीबाबत शिवसेनेने मोठी घोषणा केली आहे. सध्या सर्वच पक्ष या निवडणूकीसाठी कामाला लागले आहे, असे असताना शिवसेनेने सर्वच्या सर्व म्हणजेच ४०४ जागांवर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

शिवसेनेची प्रांत कार्यकारिणीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत भाजपवरही गंभीर आरोप करण्यात आले आहे. भाजप सरकारच्या शासन काळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पुर्णपणे फेल गेली असून महिलाही असुरक्षित आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

दारुलशफा या ठिकाणी ही बैठक झाली होती. यावेळी राज्याचे प्रमुख ठाकूर अनिल सिंग म्हणाले की, उत्तर प्रदेशातील योगी सरकार ब्राम्हणांबरोबर योग्य पद्धतीने वागत नाही. तसेच त्यांना सुविधा आणि शिक्षणही व्यवस्थित देत नाही.

पुढीलवर्षी देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहे. या राज्यांपैकी उत्तर प्रदेश हे राज्य देशातील विधानसभा निवडणूकीतील सर्वात महत्वाचे राज्य आहे. पण आता एका सर्व्हेमधून पुन्हा एकदा भाजप निवडणू येण्याची शक्यता आहे.

एबीपी सी-व्होटरने एक सर्व्हे केला आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपला २५९ ते २६७ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर समाजवादी पक्षाला १०९ ते ११७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर बीएसपीला १२ ते १६ आणि काँग्रेसला ३ ते ७ जागा मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

अशा नराधामांना सार्वजनिकरित्या फाशी द्यायला पाहिजे: साकीनाका प्रकरणावरुन अमृता फडणवीस भडकल्या
अंकिता लोखंडेची सुशांत सिंह राजपूतसोबतची पहिली भेट होती खूप भयानक; अभिनेत्रीने जुन्या आठवणींना दिला उजाळा…
जे बोलतो ते करून दाखवतो! पालघरच्या लाडक्या शार्दुलला भारतीय संघात स्थान कसे मिळाले? वाचा यशोगाथा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.