Share

बाळासाहेबांचा सच्चा शिलेदार हरपला, ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन

sudhir-joshi-shiv.j

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे आज मुंबईत निधन झाले. त्यांचे वय ८१ वर्ष होते. शिवसेना पक्षाच्या जडणघडणीमध्ये सुधीर जोशी यांची महत्वाची भूमिका होती. सुधीर जोशी हे शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून राजकीय वर्तुळात परिचित होते.(shivsena old leader sudhir joshi dead)

शिवसेना पक्षाच्या सुरवातीच्या काळात पक्षबांधणीसाठी सुधीर जोशी यांनी मोठे योगदान दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुधीर जोशी आजारी होते. गेल्या महिन्यात सुधीर जोशी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना उपचारासाठी मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते.

त्यानंतर काही दिवसांत त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. आज त्यांचे मुंबईत निधन झाले. सुधीर जोशी हे मुंबईचे दुसरे महापौर होते. राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर सुधीर जोशी यांना कॅबिनेट मंत्रिपद देखील देण्यात आले होते. त्यांनी महसूलमंत्री म्हणून राज्य सरकारमध्ये काम केले होते. १९९९ मध्ये प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी राजकारणातून निवृत्ती पत्करली होती.

राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर सुधीर जोशी सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नव्हते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर त्यांच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये सुधीर जोशी होते. सन १९७२ मध्ये ते मुंबईचे महापौर झाले. सुधीर जोशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे विश्वासू सहकारी राहिले आहेत.

बाळासाहेबांनी सुधीर जोशी यांच्याकडे सुशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीची धुरा सोपविली होती. सुधीर जोशी पदवीधर मतदारसंघाचे देखील ते पहिले आमदार होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. युतीच्या सरकारच्या काळात त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून देखील काम केले आहे.

१९६८ मध्ये सुधीर जोशी प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिकेत त्यांनी गटनेता आणि विरोधी पक्षनेता राहिले आहेत. १९६८ पासून सुधीर जोशी विधान परिषदेचे सदस्य होते. १९९२-९३ मध्ये ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची पाहणी करून त्यासंदर्भातील अहवाल शासनाकडे सादर केला होता.

महत्वाच्या बातम्या :-
नथुराम गोडसेला हिरो म्हणणाऱ्या विद्यार्थ्याला वकृत्व स्पर्धेत मिळाले पहिले बक्षीस; जाणून घ्या नक्की घडलं
हिजाब वादाला द्रौपदीच्या वस्त्रहरणाशी जोडणाऱ्या स्वरा भास्करवर नेटकरी संतापले, म्हणाले..
मुलांना दुचाकीवर बसवायचे असेल तर करावे लागणार ‘या’ नियमांचे पालन, नाहीतर बसेल मोठा दंड; वाचा नियम

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now