“३६ वर्षाच्या शिवसेनेतील राजकीय प्रवासात पहिल्यांदाच घड्याळाला मत मागतोय”

पंढरपूर: एकीकडे राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे पंढरपूर पोटनिवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. येथे समाधान आवताडे भाजपचे आणि भगीरथ भालके राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. दोन्हीकडून एकमेकांवर प्रचंड टिका होत आहे.

त्यातच आज शिवसेनेची मुलुखमैदानी तोफही पंढरपुरात धडाडली. शिवसेना नेते व पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पंढरपूरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठी सभा घेत भाजपवर तुफान टिका केली.

यावेळी गुलाबराव पाटील यांनी भाजप नेत्यांचा त्यांच्या शैलीत समाचार घेतला. 36 वर्षाच्या शिवसेनेतील राजकीय प्रवासात पहिल्यांदा घड्याळला मत मागतोय, असं ते म्हणाले. तर, खा त्यांचं मटण आणि दाबा आमचं बटन असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. यावेळी त्यांनी भाजपच आणि आमचं लव्ह मॅरेज होतं. मी जादुगार नाही संत नाही पण चेहरे चांगले ओळखतो, असं म्हणत भाजपला टोला लगावला.

तसेच आज खूप दिवसांनंतर पहील्यांदाच अजित पवारांचे आक्रमक रूप पहायला मिळाले.  राज्यातील आघाडी सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. सरकार पाडणे  कोणा येडा गबाळ्याचे काम नाही, अशा शब्दात आज अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यांदाच थेट निशाणा साधला. आजवर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर इतक्या थेट शब्दात कधी टिका केली नव्हती.

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या केलेल्या नकलीवर अजित पवार भडकले. आपण कोणाच्या भानगडीत नसतो आणि आपला नाद कोणी करायचा नाही आणि केला तर… असे म्हणत गर्भित इशाराही अजित पवारांनी दिला.

फडणवीस यांनी शरद पवार यांच्या पावसात भिजण्यावर केलेल्या वक्तव्याचाही अजित पवार यांनी समाचार घेतला.  तुम्ही कुठे, साहेब कोठे…. म्हणत फडणवीस यांना जागा दाखवून दिली. अजित पवार यांनी आज चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख ‘चंपा’ असा करत ते उद्या येथे येऊन काहीही सांगतील पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं सांगत सभेची सांगता केली.

तत्पूर्वी जयंत पाटलांनीही भाषण करत सभा गाजवली. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की,  भाजपने ५ वर्षे पक्षीय राजकारण केले. भारतनाना काँग्रेसचे आमदार होते म्हणून भाजपने त्यांच्या २४ गावांच्या पाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. आज फडणवीस इथे येऊन सांगत आहेत की भाजपला मत द्या. मी पंतप्रधान मोदी यांच्याकडून पैसे आणतो. मोदी यांनी महाराष्ट्राच्या हक्काचा जीएसटीचा परतावा अद्याप दिला नाही तर इतर मागण्या काय मान्य करतील? असा सवाल त्यांनी केला.

भाजप प्रचार करताना सांगतंय की आम्हाला भारतनानांबद्दल आदर आहे. भाजपला भारतनानांबद्दल आदर आहे तर मग ही निवडणूकच का होत आहे? मंगळवेढा-पंढरपूरची जनता सूज्ञ आहे. ते नक्कीच निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून भाजपला योग्य उत्तर देतील. असा आशावाद जयंत पाटलांनी व्यक्त केला.

भाजपकडे आता कार्यकर्त्यांची अत्यंत कमतरता आहे. कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नाही म्हणून अनेक जण महाविकास आघाडीची वाट धरत आहे. हे चित्र पाहता मला प्रश्न पडला आहे की देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का? अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली.

विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरातील लोकांचे प्रश्न आहेत. कारखान्याचे प्रश्न आहेत, शहरातील इतरही प्रश्न आहेत. इथला कायापालट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार भगीरथ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. त्यामुळे नानांच्या भगीरथला मत स्वरुपात आशीर्वाद द्या. असे आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी केले.Jayant Patil gst Devendra fadanvis Narendra Modi Gulabrav Patil

महत्वाच्या बातम्या
रेशनकार्डमध्ये घरातील नवीन सदस्याचे नाव कसे जोडायचे? तेही घरच्या घरी; जाणून घ्या..
मुंबईने कोलकात्याच्या तोंडातला घास काढून घेतला; रोहीतच्या कॅप्टन्सीने अक्षरश गेलेली मॅच खेचून आणली
आनंद शिंदेंनी फडणवीसांना सुनावले;पवार सायबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.