राणे नावाने शिवसेना घाबरते, परत समोर आले तर…! नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा

मुंबई । दोन दिवसांपूर्वी मुंबईत राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना भवनावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. यावेळी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. काही शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्ते आणि महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आला.

या प्रकरणामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये टीका टिप्पणी सुरू आहे. यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन हे आमच्या अस्मितेचे प्रतिक आहे. शिवसेना भवनावर मोर्चा काढायचा नाही, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी भाजपला दम भरला होता.

यामुळे भाजप देखील आक्रमक झाली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सत्कार केला आहे. यामुळे प्रकरण अजूनच तापले आहे.

यावेळी नितेश राणे यांनी शिवसेनेवर हल्ला केला, ते म्हणाले, राणे नावाने शिवसेना घाबरते. परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी शाल श्रीफळ आणि छत्रपती शिवरायांनी प्रतिमा देऊन भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला.

राम मंदिर प्रकरणी शिवसेना बिनबुडाचे आरोप करत आहे. हिंदू धर्मियांच्या भावनेशी खेळणाऱ्या आणि राम मंदिर उभारणीच्या आड येत असल्याचा आरोप भाजपने केला. यामुळे भाजपच्या युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी तुफान हाणामारी बघायला मिळाली. शिवसेना भवनावर कोणी चालून आले तर त्याला प्रसाद मिळणारच असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला होता. यामुळे प्रकरण चांगलेच तापले आहे.

ताज्या बातम्या

या पोलीसाच्या जागी मेहुणा करत होता पोलीस ड्युटी, ५ वर्षांनंतर असा झाला उलगडा, जाणून घ्या..

मोठी बातमी! तीन न्यूज चॅनेल्सना दंड, माफी मागण्याचे निर्देश, तबलिगी प्रकरण आले अंगटल

बाबा का ढाबा: कांता प्रसाद यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन केला आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.