गुढीपाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढावेत, असं अल्टिमेटम देखील राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं आहे. भाजपने देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांच्या मशिदींवरील भोंग्यांबाबतच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.(shivsena mp Sanjay Raut criticizes BJP)
मशिदींवरील भोंग्यांच्या राजकारणावर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भोंग्याच्या राजकारणामुळे हिंदुत्व बदनाम होतंय. या भोंगावादामागे भाजपचाच हात आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी, आम्हाला भोंग्याबाबत कोणीही अक्कल शिकवू नये, असा टोला देखील संजय राऊत यांनी नाव न घेता भाजपला लगावला आहे.
यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “आता जे काही हिंदुत्वाच्या नावावर राजकीय भोंगे वाजत आहेत, ढोंग सुरु आहे. हे ढोंग फार काळ चालणार नाही. या भोंग्याच्या वादामुळे हिंदुत्व बदनाम होतंय. हिंदुत्वाबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण होतेय. भोंग्याबद्दल भाजपला भूमिका घ्यायचीच असेल तर पंतप्रधान मोदींनी भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण तयार करावं”, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, “आतापर्यंत गुजरातमधील लाऊडस्पीकर काढण्यात आलेले नाहीत. उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये जाऊन पाहा. गोवंश हत्यासंबंधी केंद्राकडून एक धोरण तयार करण्यात आलं होतं. पण काही राज्यांना तुम्ही सूट दिली होती. तसेच गोवा राज्याने तुमचं धोरण स्वीकारण्यास नकार दिला होता.”
“म्हणून पंतप्रधानांना मी आवाहन करतो की, तुमच्या पक्षातील लोंकानी भोंग्याचा जो वाद उभा केला आहे, त्या वादावर राष्ट्रीय धोरण तयार करा आणि सर्वात आधी हे धोरण बिहारमध्ये, दिल्ली त्यानंतर गुजरातमध्ये लागू करा. महाराष्ट्र तर कायद्याचं पालन करणारं राज्य आहे. हिंमत असेल तर धोरण तयार करा आणि त्याची सक्तीने अंमलबजावणी करा”, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर देखील टीका केली आहे. “उत्तर प्रदेशातील निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने एमआयएमच्या औवेसींचा वापर केला. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात हिंदू समाजात काही औवेसी निर्माण करण्यात आले आहेत. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात फूट पडली जात आहे. तसेच दंगली घडवल्या जात आहेत”, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मशिदींवरील भोंग्यांबाबत संजय राऊतांचं थेट मोदींना आवाहन; म्हणाले, ‘हिंमत असेल तर…’
‘…मुंबईकर ऊठ, उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट’; सुधीर मुनगंटीवारांचा नवा नारा
भाजप हा काही १९८० मध्ये स्थापण झालेला पक्ष नाही, भाजपला ५ हजार वर्षांचा इतिहास – चंद्रकांत पाटील