महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांमध्ये अंतर्गत वादाच्या चर्चा नेहमीच समोर येत असतात. आता शिवसेनेने पुन्हा एकदा आपला मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. “आधी भाजपने आमची ठोकली. आता मित्रपक्षच आमची ठोकतोय”, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय जाधव(Sanjay Jadhav) यांनी राष्ट्रवादी पक्षावर टीका केली आहे.(Shivsena mp sanjay jadhav angry on NCP)
पुण्यातील शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी हे वक्तव्य केलं आहे. शिवसेनेकडून पुणे शहरात २५ मे ते २९ मे शिवसंपर्क अभियान कार्यक्रम राबविला जात आहे. खासदार संजय जाधव हे पुणे शहर शिवसंपर्क अभियान कार्यक्रमाचे प्रमुख आहेत. त्यांनी काल पुणे शहरातील विकासकामांचा आढावा घेतला.
यावेळी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. “पक्षाकडून कार्यकर्त्यांना पाठबळ मिळत नाही हे शिवसंपर्क अभियानातून समोर आले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही आम्हाला पाठबळ मिळाले नाही”,अशी खंत शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली आहे.
यावेळी शिवसेनेचे खासदार संजय जाधव म्हणाले की, “शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना काम करताना भेडसावणाऱ्या अनेक समस्या आहेत. “शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही आम्हाला या जिल्ह्यात पाठबळ मिळायला हवे तेवढे मिळत नाही. ही खंत सर्व पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे”, असे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी सांगितले आहे.
शिवसेनेचे खासदार संजय जाधव पुढे म्हणाले की, “शिवसेनेचा एकही आमदार नाही, भाजपचा आमदार आहे. राष्ट्रवादीचा आहे, पालकमंत्री राष्ट्रवादीचे आहेत. महाविकास आघाडीच्या निकषांप्रमाणे ज्या पक्षाचा आमदार आहे त्यांना ६० टक्के आणि इतरांना २०-२० टक्के सत्तेचा शेअर देणं अपेक्षित आहे. पण शिवसेनेला विकासकामांच्या निधीचा शेअर मिळत नसल्याची खंत कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे”, असे खासदार संजय जाधव यांनी सांगितले आहे.
“त्यांच्या कमिट्या होतात,पदाधिकाऱ्यांना सर्व दिलं जातं. पण शिवसेनेला हेतू परस्पर दिलं जातं नाही.असे पदाधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे. यासंदर्भातील माहिती मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवणार आहे. राष्ट्रवादीवर नाराजी दाखवायचे कारणच नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. महाविकास आघाडीच्या निकषांप्रमाणे आम्हाला आमचा शेअर मिळायला हवा, अशी मी अजित पवार यांना विनंती करतो”, असे शिवसेनेचे खासदार संजय जाधव म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
“आम्ही ६० वर्षांत केलं तेच विकून तुम्ही सरकार चालवताय”; सुप्रिया सुळेंनी मोदींना सुनावले
ड्रग्ज केसमध्ये आर्यन खानला क्लिनचीट मिळताच गृहमंत्रालयाने समीर वानखेडे भोवतीचा फास आवळला
आर्यन खानला क्लिनचिट मिळताच समीर वानखेडे म्हणाले , ‘मला माफ करा’