सर्व भारतीय बांगलादेशच्या निर्मितीच्या बाजूने होते, तर मोदींनी सत्याग्रह कशासाठी केला?

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी शेजारी देश बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहेत. बांग्लादेश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रमासाठी मोदींना निमंत्रित करण्यात आले आहे.  यावेळी आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केले होते.

मोदी म्हणाले की, “बांग्लादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होतो. त्यावेळी मला अटकही झाली होती. बांग्लादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सत्याग्रह करणे हे माझ्या आयुष्यातील सुरूवातीच्या आंदोलनातील महत्वाचे आंदोलन होते.”

बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी बांग्लादेश आणि भारतातही प्रयत्न सुरू होते. स्वातंत्र्य संघर्षात मी २०-२२ वर्षांचा असताना माझ्या सहकाऱ्यांसह बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारतात सत्यागृह केला.” मोदींच्या या वक्तव्यावरून देशात भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार शाब्दिक युध्द रंगले आहे.

शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चर्तुर्वेदी यांनी ट्विट करत मोदींच्या वक्तव्यावर सवाल उपस्थित केले आहेत. चर्तुर्वेदी म्हणाल्या, “१९७१ साली भारतीय पंतप्रधानांनी अनेक देशांच्या विरोधाचा सामना करून बांग्लादेशला मदत केल्याचं म्हटलं आहे. १९७१ मध्ये भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेसारख्या देशाने केलेल्या विरोधाचा सामना करूनही बांग्लादेशला पाकिस्तानातून स्वातंत्र्य मिळवून दिलं.”

पुढे म्हणाल्या, “मला  प्रश्न पडला आहे की, जर सर्व भारतीय एकाच मताचे होते तर सत्यागृह करण्याची काय गरज होती आणि यासाठी कोणाला अटक का केली जाईल? मला खात्री आहे की १९७१  संदर्भात आपल्याला लवकरचं नवीन माहिती मिळेल.”

महत्वाच्या बातम्या-
मी बांग्लादेशच्या स्वातंत्र्य लढ्यातही सहभागी होतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी
सुहाना सुंदर दिसते की तिच्या मैत्रिणी सुंदर दिसतात? फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न
नाव परमवीर अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी; रूपाली चाकणकरांनी केली भलतीच पोलखोल
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी शिवसेनेच्या संजय राऊतांना झाप झाप झापले, म्हणाले…

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.