Shivsena News: राज्यातील राजकीय तापमान आता हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीसच तापलं आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला काल सोमवारपासून उपराजधानी नागपूर (Nagpur) येथे सुरुवात झाली. अधिवेशनात शेतकरी प्रश्न, विविध घटकांचे मुद्दे आणि महायुती सरकारची कामगिरी यावरून विरोधकांची महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) मोर्चेबांधणी सुरु असतानाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
शिवसेना नेते व आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर तीन व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओंमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) नोटांच्या बंडलांसह दिसत आहेत. दानवे यांनी सरकारकडे प्रश्न उपस्थित केला आहे: “ही आमदार कोण आहेत आणि पैशांच्या बंडलांसह काय करत आहेत?”
दानवे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओंपैकी दोन व्हिडिओंमध्ये नोटांच्या बंडलांसह एक व्यक्ती दिसते, तर तिसऱ्या व्हिडिओत महेंद्र दळवी प्रत्यक्ष दिसून येतात. दानवे म्हणाले की, “या सरकारकडे शेतकरी कर्जमाफीसाठी पैसा नाही, पण इतर गोष्टीसाठी पैसा आहे. जनतेला सांगायला हवे, CM देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिंदेजी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांसोबत काय करत आहेत?”
महेंद्र दळवींकडून पलटवार
व्हिडिओ समोर आल्यावर महेंद्र दळवी यांनी जोरदार पलटवार केला. त्यांनी सांगितले, “नोटांच्या बंडलांसह व्हिडिओ माझेच आहेत, आणि अंबादास दानवे यांनी जे सांगितलंय, ते सिद्ध करावं. मला त्यांना ओपन चॅलेंज आहे. सध्या पक्षात कोणीतरी विचारतोय का? नाही. त्यामुळे ते फक्त ब्लॅकमेलिंग करत आहेत. एवढे लक्ष देण्यासारखे नाहीत, पण मी हा मुद्दा हिवाळी अधिवेशनातही मांडणार आहे.”
यानंतर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होण्याआधीच दानवे यांनी हा व्हिडिओ समोर आणला. त्यामुळे महायुती सरकारवर दबाव निर्माण झाला आहे आणि अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता अधिक वाढली आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात काय घडते, याकडे सर्वांची नजर लागलेली आहे.
या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे!
जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?@mieknathshinde @Dev_Fadnavis @AmitShah @BJP4Maharashtra #Moneypower #ruins #Maharashtra pic.twitter.com/WUDpmedTgo— Ambadas Danve (@iambadasdanve) December 9, 2025






