शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे(Shivsena) १३ आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. सुरतमधील मेरिडीयन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ११ आमदारांसोबत वास्तव्यास असल्याचे सांगितले जात आहे.(shivsena-mla-filed-reoprt about MLAs were forcibly taken to Surat)
यादरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना आमदारांवर हल्ले केले जात आहेत, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, “अनेक आमदारांच्या कुटुंबियांनी तक्रार केली आहे. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने तक्रार केली आहे की जबरदस्तीने त्यांचं अपहरण करून त्यांना सुरतला नेण्यात आलं आहे आणि त्यांच्या जीवाला धोका आहे”, असे शिवसेना नेते संजय राऊतयांनी सांगितले आहे.
शिवसेना नेते संजय राऊत पुढे म्हणाले की, “आतापर्यंत अशा ९ आमदारांच्या कुटूंबियांनी तक्रारी केल्या आहेत. या गोष्टी अशाच चालू राहिल्या तर मुंबई पोलिसांना यासंदर्भात कठोर कारवाई करावी लागेल”, असे शिवसेना नेते संजय राऊतयांनी सांगितले आहे. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
“मध्यप्रदेश, राजस्थान यांच्यापाठोपाठ भाजपने महाराष्ट्रात गुजरातच्या भूमीवरून जे ऑपरेशन ‘लोटस’ सुरु केले आहे. त्याचा आम्ही सामना करू. हे सर्व भाजपचं षडयंत्र आहे. एकनाथ शिंदें यांचं गैरसमज आम्ही लवकरच दूर करू. आमचे दोन लोक त्या ठिकाणी गेले आहेत. ते आमदारांसोबत चर्चा करणार आहेत”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदेनी पाठवलेल्या प्रस्तावाबद्दल बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, “शिवसेनेमध्ये अशा प्रस्तावाला स्थान नाही. एकनाथ शिंदे आमचे सहकारी आहेत. त्यांचे आमच्यासोबत अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात ते मंत्री झाले आहेत. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचीच आहे आणि राहील”, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
कोण आहेत एकनाथ शिंदे ज्यांच्यामुळे उद्धव ठाकरेंची खुर्ची आली धोक्यात? जाणून घ्या राजकीय प्रवास
“सुरतच्या हाॅटेलमध्ये शिवसेना आमदारांवर खुनी हल्ले होत आहेत, त्यांच्या जीवाला धोका”
खरंच उद्धव ठाकरे सरकार आता कोसळणार? आकड्यांमध्ये समजून घ्या विधानसभेचे गणित