शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची सध्या चर्चा आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ३६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्वजण गुवाहटीमधील रेडिसन हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.(shivsena minister gulabrao patil going to guvahti to support eknath shinde)
यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीला रवाना होणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. गुलाबराव पाटील हे महाविकास आघाडी सरकारमध्ये पाणीपुरवठा मंत्री आहेत. गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.
शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ‘नॉट रिचेबल’ झाल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या समर्थकांना एक मेसेज पाठवला आहे. या मेसेजमध्ये ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिले आहे. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी हा मेसेज पाठवल्यानंतर ते ‘नॉट रिचेबल’ झाल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यासोबत संपर्क होत नसल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
शिवसेनेच्या आमदार यामिनी यशवंत जाधव आणि आमदार गीता जैन या देखील काल एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्या आहेत. आमदार यामिनी यशवंत जाधव आणि आमदार गीता जैन काल इतर आमदारांसोबत गुवाहाटीला पोहचल्या आहेत. काल दुपारी झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत यामिनी जाधव या आजारपणाचे कारण देवून गैरहजर राहिल्या होत्या.
तेव्हापासून आमदार यामिनी जाधव एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण आज सकाळी आमदार यामिनी यशवंत जाधव शिवसेने विरुद्धच्या बंडात सामिल झाल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार लता सोनावणे देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
बंडखोरीची स्क्रिप्ट दोन महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आली होती, आमदाराचा मोठा खुलासा; म्हणाला..
दोन महिन्यांपूर्वीच ठरला होता बंडखोरीचा प्लॅन, शिवसेनेच्या आमदाराने सगळंच सांगीतलं; म्हणाला
शिवसेनेत भूकंप! आमदारांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं व्यक्तव्य; वाचा काय काय म्हणाले?