शिवसेना नगरसेवकाच्या मुलीच्या लग्नात तुफान गर्दी; कोरोना नियमांचे उल्लंघन, तोंडावर मास्क पण नाही

 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकार वेगवेगळ्या गाईडलाईन्स आखत आहे, असे असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेला सर्व नियम पाळण्याचे आवाहन केले होते.

आता मुख्यमंत्री सर्वांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करत असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेना नगरसेवकाच्या मुलीच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसून आला आहे. त्यामुळे कोरोना नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहे का? असा प्रश्न उपस्थित होत.

शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात मोठी गर्दी असल्याचे दिसून आले आहे. कुठल्याही सोशल डिस्टन्सिंगचविना सोहळा झाल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील वायले यांच्या मुलीचा लग्न सोहळा नुकताच पार पडला आहे, यावेळी लग्नात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली आहे. तसेच अनेकांच्या तोंडावर मास्क दिसले नाही, विशेष म्हणजे वेळेची मर्यादा असताना लग्नात त्याचे उल्लंघन सुद्धा झाले आहे.

दरम्यान, डोंबिवलीमध्ये आंदोलन करणाऱ्या काही मोजक्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यामुळे सर्व लोकांना नियम सांगणारे मुख्यमंत्री आता आपल्या नेत्यांना काय सांगणार? असा प्रश्न सर्व लोकांना पडला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.