राज्यसभा निवडणूकीप्रमाणे विधान परिषदेत देखीलव महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका बसला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. यादरम्यान राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत.(shivsena leader nilam gore ssaid exactly what happened in party office)
विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन्हीही उमेदवार विजयी झाले असले तरीही शिवसेना नेते एकनाथ शिंदे पक्षावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ११ आमदारांसोबत सुरतमधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व प्रकरणावर शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी मतं व्यक्त केलं आहे.
शिवसेना नेत्या मनीषा कायंदे म्हणाल्या की, “या सगळ्या अफवा आहेत आणि असे काही नाही. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील प्रमुख नेते आहेत. त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी असल्याने या सगळ्या अफवा आहेत. यामध्ये काहीही तथ्य नाही. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत की नाही याच्याबद्दल पण मला शंका आहे”, असे शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी सांगितले आहे.
शिवसेना नेत्या मनीषा कायंदे पुढे म्हणाल्या की, “विरोधी पक्षातील लोकांना हे सर्व बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. महाविकास आघाडीची एक जागा यायला हवी होती. पण ती का नाही आली यावर तिन्ही पक्षातील लोक विचार करतील”,असे शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे ‘नॉट रिचेबल’ झाल्याच्या प्रकरणावर शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील भाष्य केलं आहे.
शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “संध्याकाळी आम्ही जेव्हा पक्ष कार्यालयात जमलो होतो. तेव्हा एकनाथ शिंदे आमच्यासोबत उपस्थित होते. उद्धव ठाकरेंच्या शेजारी बसून ते सर्व आमदारांची विचारपूस करत होते. पण थोड्यावेळात त्यांच्याबाबत स्पष्टता येईल. एकनाथ शिंदे किती कार्यमग्न असतात याची आपल्याला कल्पना आहे.”
“त्यामुळे ते काही वेळात ते आपल्या संपर्कात असतील याची मी ग्वाही देऊ शकते”, असे शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका मांडतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
“शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”
विधान परिषदेचे मतदान सुरु असतानाच एकनाथ शिंदेनी केलं प्लॅनिंग, धक्कादायक माहिती समोर
मुख्यमंत्री आमदारांसोबत बोलत असतानाच एकनाथ शिंदेनी गेम केला, महत्वाची माहिती समोर






