Homeताज्या बातम्याशिवसेनेची पहिली शाखा सुरू करणाऱ्या शिवसैनिकाने केली आत्महत्या; वाचा दर्दनाक कहाणी..

शिवसेनेची पहिली शाखा सुरू करणाऱ्या शिवसैनिकाने केली आत्महत्या; वाचा दर्दनाक कहाणी..

उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या एका शिवसैनिकाने आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे. आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. उस्मानाबादमधील या शिवसैनिकाचे नाव दत्तात्रय नारायण वऱ्हाडे असे आहे. दत्तात्रय वऱ्हाडे यांनी १९८४ साली उस्मानाबाद शहरात जिल्ह्यातील पहिली शिवसेनेची शाखा स्थापन केली होती.

संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दत्तात्रय वऱ्हाडे यांची ओळख सच्चे शिवसैनिक अशी होती. शिवसैनिक दत्तात्रय वऱ्हाडे हे एवढे कट्टर शिवसैनिक होते की, कोणत्याही निवडणुकीच्या प्रचारामध्ये ते पुढे असायचे. उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक घरोघरी जाऊन ते प्रचार करायचे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची निस्सीम श्रद्धा होती. शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून ते या परिसरात ओळखले जात होते.

अगदी मोजक्या तरुणांना सोबत घेऊन दत्तात्रय वऱ्हाडे यांनी १९८४ साली उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली होती. ही शाखा सुरू करताना दत्तात्रय वऱ्हाडे यांच्याकडे पुरेसे पैसे देखील नव्हते. तरीही त्यांनी उधार पैसे घेऊन शिवसेनेची पहिली शाखा उस्मानाबाद शहरात स्थापन केली होती.

दत्तात्रय वऱ्हाडे यांची उस्मानाबाद शहरात चहाची टपरी होती. त्या चहाच्या टपरीवरच दत्तात्रय कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवत होते. पण ज्यावेळेस उस्मानाबाद जिल्ह्यात निवडणुका असतील त्यावेळी ते चहाची टपरी बंद करुन शिवसेनेचा प्रचार करायचे. दत्तात्रय वऱ्हाडे यांना ४ मुली आणि २ मुले आहेत. या चहाच्या टपरीच्या पैशातूनच त्यांनी आपल्या मुलींची लग्न केली होती.

आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे दत्तात्रय वऱ्हाडे यांच्या मुलांना शिक्षण घेता आलं नाही. त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून कामधंदा करायला सुरवात केली होती. दत्रात्रय वऱ्हाडे हे कुटुंबासाठी कधीच वेळ देत नव्हते, मात्र शिवसेना पक्षासाठी ते कायम उपलब्ध असायचे, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. ते शिवसैनिक होते, यांचा त्यांना खूप अभिमान होता, असे देखील दत्तात्रय वऱ्हाडेंच्या कुटुंबियांनी सांगितले.

मागील ४० वर्षामध्ये शिवसेनेत अनेक कार्यकर्ते आले आणि अनेक कार्यकर्ते सोडून गेले. मात्र, दत्तात्रय वऱ्हाडे कायम शिवसेनेशी आणि बाळासाहेबांशी एकनिष्ठ राहिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हीच त्यांची खरी दौलत होती. शिवसेनेत येणारे अनेकजण मोठे आमदार, खासदार झाले. पण दत्तात्रय वऱ्हाडे कायम कार्यकर्ताच राहिले. त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात १९८४ साली ज्या शिवसेनेचं छोटसं रोपटं लावलं होत, आज त्याच जिल्ह्यात शिवसेनेची राजकीय ताकद मोठी वाढली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
६० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या पर्ल ग्रुपच्या चेअरमनचा तुरूंगातच मृत्यु, वाचा ‘त्या’ घोटाळ्याबद्दल..
शेअर मार्केटमधून कमाई करायची तर ‘या’ पाच गोष्टी लक्षात ठेवा; zerodha च्या संस्थापकांनी दिल्या खास टिप्स
कोण आहेत प्रदीप कंद ज्यांच्यामुळे पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झाला विजय?