मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणासाठी मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्यांनी माघार घेतली आहे. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात विघ्न नको, असे म्हणत आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी माघार घेतली आहे. आक्रमक शिवसैनिकांसमोर ते अखेर नरमले आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.(Shiv Sena’s direct threat to rana couple)
यापुढे कुणी शिवसेनेच्या, मातोश्रीच्या नादाला लागाल तर आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून या, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट धमकी दिली आहे. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर देखील टीका केली आहे. आम्हाला हिंदुत्वपणा शिकवण्याचा शहाणपणा करू नये, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.
नागपूरमध्ये खासदार संजय राऊत यांची आज पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासुन काही घंटाधारी बोगस हिंदुत्ववादी महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत होते. मुंबईत येऊन हनुमान चालिसा वाचू, अशी भाषा त्यांनी वापरली होती.”
“अमरावतीच्या बंटी बबलीने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण आता पंतप्रधान दौऱ्याचं कारण सांगून त्यांनी पळ काढला आहे. शेपूट घातलं आहे. पंतप्रधान दौऱ्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मोदी आमचे देखील पंतप्रधान आहेत. पंतप्रधानांच्या रक्षणासाठी शिवसैनिक ठामपणे उभा राहणार आहे”, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
शिवसेना खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, “बंटी बबलीचा दावा साफ चुकीचा आहे. मला आमच्या शिवसैनिकांचं आश्चर्य आणि कौतुक वाटतंय. आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी अँब्युलन्स तयार ठेवली होती. शिवसैनिकांनी मानवतावादी दृष्टिकोन दाखवला आहे. याचा मला आनंद आहे. मातोश्रीवर घुसून काही वेगळं कारस्थान करण्याचं बंटी बबली यांनी ठरवलं होतं. पण आमच्या शिवसैनिकांनी त्यांना घराबाहेर पडू दिलं नाही”, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
“शिवसेनेचं हिंदुत्व घंटाधारी नाही. आमचं हिंदुत्व गदाधारी आहे. आम्हाला हिंदुत्वपणा शिकवण्याचा शहाणपणा कोणीही करू नये. शिवसेनेच्या नादाला लागू नका, नाहीतर २० फूट खोल खाली गाडले जाल. हे कॅमेऱ्याच्या समोर सांगतोय. तुमहाला रोखण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. राणा बोगस प्रमाणपत्रावर निवडून आल्या आहेत. बोगस प्रमाणपत्रावर निवडून आलेल्या लोकांनीआम्हाला नीतिमत्ता शिकवू नये”, असे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
१७ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म पण बाळाचा बाप अवघ्या १२ वर्षांचा; काय आहे नेमकी घटना? जाणून घ्या.
झालं तेवढं खूप झालं, आता सौजन्याची ऐशीतैशी, शिवसेनेचा निर्वाणीचा इशारा; काहीतरी मोठं घडणार
बिस्लेरीची अर्धी बाटली बंटी बबलीची फुलऑन फाटली; राणांच्या माघारीनंतर शिवसैनिकांचा तुफान जल्लोष