…तर तृप्ती देसाईच्या तोंडाला काळ फासू; शिवसेनेच्या वाघिणीने दिला इशारा

मुंबई | साई दर्शनाला‌ जाताना भारतीय पेहरावात या असे आवाहन साईबाबा संस्थानने भाविकांना केले आहे. यावरून मंदिरातले पुजारी अर्धनग्न असतात मग भक्तांच्या कपड्यांवर निर्बंध का घातले जात आहेत? असा प्रश्न आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी साई संस्थानला विचारला आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिला संघटक स्वाती परदरेशी यांनी तृप्ती देसाई यांना इशारा दिला आहे. ‘शिर्डीत येऊन स्टंटबाजी केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तरं देऊ आणि तोंडाला काळ फासू असा इशारा शिवसेनेच्या वाघिणीने दिला आहे.

वाचा काय म्हणाल्या होत्या तृप्ती देसाई?
‘मंदिरात येणारे भक्त हे देश-विदेशातून येतात. हे भक्त वेगवेगळ्या जातीचे आणि धर्माचे असतात. शिर्डी संस्थानने मंदिरात सभ्य पोशाख घालून यावे असे सांगितले आहे. मात्र भारताच्या घटनेने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, ‘मंदिरात प्रवेश करताना कोणत्या प्रकारचे कपडे असले पाहिजेत त्याचं भान भक्तांना आहे. भक्तांची श्रद्धा कपड्यांवरुन ठरवता येत नाही. श्रद्धा महत्त्वाची असते,’ असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. आता तृप्ती देसाई यांनी मांडलेल्या या भूमिकेने वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
मंदिरातले पुजारी अर्धनग्न, मग भक्तांच्या कपड्यांवर निर्बंध का?
योगीजी! …मग फिल्म इंडस्ट्री नेण्याचा विचार करा; राष्ट्रवादी काँग्रेसचा टोला
‘आम्ही मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशला नेणार नसून नव्याने उभारणार आहोत’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.