२०१४ मध्ये शिवसेनेनेही म्हटले होते ‘देश स्वतंत्र झाला’, भाजपने पुरावा दिल्याने शिवसेना तोंडावर आपटली

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे तिच्यावर टीका होत आहे 1947 ला मिळालेले स्वातंत्र्य नसून ती भीक होती खरे स्वातंत्र्य 2014 ला मिळाले असे वक्तव्य तिने केले होते यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला

तिच्या या वक्तव्यानंतर जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील तिला पाठिंबा दिला. यामुळे दोघांवर सध्या टीका केली जात आहे. यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही या विधानांवरून कंगना आणि विक्रम गोखलेंवर निशाणा साधला आहे. यामुळे हे प्रकरण चांगलेच गाजत आहे.

असे असताना आता भाजपने देखील याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सामना दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचे कात्रण शेअर करत शिवसेनेला प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे आता शिवसेना तोंडावर पडली आहे.

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने देशात मोठा विजय मिळवला होता. यात शिवसेनेला १८ तर भाजपाला २३ जागा मिळाल्या होत्या. त्या विजयाचा आनंद व्यक्त करताना सामनाच्या मुख्य बातमीचे शीर्षक हिंदुस्थान काँग्रेसमुक्त! देश पुन्हा स्वतंत्र!! असे दिले होते.

आता हीच बातमी भाजपा प्रवक्ते  अतुल भातखळकर यांनी शेअर करत शिवसेनेवर निशाना साधला आहे. यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यावर आता शिवसेना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, कंगनाने केलेल्या वक्तव्यावरून तिच्यावर अनेकांनी टीका केली. यामुळे भाजपवर देखील अनेकांनी टीका केली. यामुळे भाजपने देखील शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आता संजय राऊत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.