Shivsena : सध्या राज्यात शिवसेना पक्षात मोठा वाद सुरु आहे. शिवसेनेचे दोन गट निर्माण झाल्याने खरी शिवसेना कोणाची? याचा सुप्रीम कोर्टात वाद सुरु आहे. याबाबत कोर्टाने अजून कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे दोन्ही गटांकडून शिवसेना पक्षावर आणि धनुष्यबाण चिन्हावर आपला दावा सांगण्यात येत आहे.
शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडून दोन्ही गट विविध मुद्द्यांवरून सतत आमनेसामने येत आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अनेक दावे प्रतिदावेही करण्यात येत आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी विविध राज्यातील शिवसेनाप्रमुख आपल्यासोबत असल्याचा दावा केला होता.
मात्र, आता हा दावा शिवसेनेकडून फेटाळून लावण्यात आला आहे. विविध राज्यातील शिवसेनाप्रमुख शिवसेना भवनात उपस्थित झाले आहेत. नुकतीच या नेत्यांची बैठक युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली आहे.
यापूर्वीही अनेक राज्यातील शिवसेनाप्रमुख शिंदे गटासोबत असल्याचा दावा करण्यात आला होता. यात दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गोवा, मणिपूर, छत्तीसगड या राज्यांचा समावेश होता. परंतु, उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचा हा दावा फेटाळून लावला.
हे नेते आज आदित्य ठाकरेंच्या बैठकीत उपस्थित होते. त्यामुळे फक्त २ ते ३ शिवसनेचे राज्य प्रमुख शिंदे गटासोबत असून बाकी सर्वजण आपल्यासोबत असल्याचे ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी शिंदे गटाने केलेला दावा खोटा ठरवला आहे.
यासोबतच दसरा मेळाव्यावरूनही शिवसेनेत प्रचंड वाद सुरु आहे. शिवतीर्थावर ठाकरे आणि शिंदे यांच्यापैकी कोणाचा दसरा मेळावा होणार याबाबतचा निर्णय अजून महापालिकेने दिलेला नाही. त्यामुळे या मुद्द्यावरूनही प्रचंड वाद सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
Banglore : इन्स्टावर न्युड फोटो शेअर केल्याने भडकली गर्लफ्रेंड, मित्रांसोबत मिळून ‘असा’ केला बॉयफ्रेंडचा खून
Health : हृद्यविकाराचा झटका सकाळीच का येतो? कोणाला याचा धोका जास्त असतो? वाचा आणि सावध व्हा!
politics : ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच एक नंबर! पवारांनी थेट आकडेच सांगितले, भाजपचा दावा काढला खोडून
Raju Srivastava : कार्डियाक अरेस्टमुळे गेला राजू श्रीवास्तव यांचा जीव, तुम्हीही ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष