‘महाराजांच्या नावाने विमानतळ ओळखले जाईल, याची व्यवस्था शिवसेना करणारच’

मुंबई । काल मुंबईत शिवसैनिकांनी राडा केला. मुंबई विमानतळावर अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावल्याने शिवसेनेने तो बोर्ड फोडला. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी देखील केली. यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळपासून या हलचाली सुरू होत्या.

आता यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ या नावानेच ओळखले जायला हवे. उद्योगपतींच्या नावाने विमानतळ ओळखले जाणार असेल तर नक्कीचं ते शिवसेनेला मान्य नाही. महाराष्ट्राला मान्य नाही आणि देशालाही मान्य नाही.

याची व्यवस्था देखील शिवसेना केल्या शिवाय राहणार नाही. शिवसैनिकांनी या बोर्डची तोडफोड केली. सकाळपासून शिवसैनिक आक्रमक झाले होते. मुंबई एअरपोर्टला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले आहे. तिथे महाराजांचे नाव असले पाहिजे. याठिकाणी अदानी एअरपोर्ट असे नाव दिले आहे.

यामुळे शिवसैनिक संतप्त झाले, म्हणून कार्यकर्त्यांनी ते तोडले. अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली आहे. यामुळे आता तो बोर्ड पुन्हा तिथे लावला जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अदानी समूहाकडून देखील याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

तसेच गेल्या काही दिवसांपासून मुंबईत होत असलेल्या नवीन विमानतळाबाबतच्या नामकरणावरून देखील वाद सुरू आहे. शिवसेनेकडून याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आहे, तर काहींनी याला विरोध देखील केला आहे.

ताज्या बातम्या

तुटलेले स्टिक्स घेऊन केला सराव, वडिलांची ८० रुपये कमाई, राणी रामपालने दाखवले ऑलम्पिक पदकाचे स्वप्न

इंडिअन आयडल १२: पवनदीप, अरुणीता, षण्मुखप्रिया यांना मिळाले २० गाण्यांचे कॉन्ट्रेक्ट; ट्रॉफी जिंकण्याआधीच लागली लॉट्री..

सिंधूला अलिशान कार द्या, मागणीला आनंद महिंद्रा यांनी दिले ‘हे’ उत्तर, जाणून घ्या..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.