शिवसेना भाजप पुन्हा युती होणार? राजकारणात काहीही घडू शकते एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य..

औरंगाबादमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावली होती.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना भाजपा मंत्र्यांचा उल्लेख करत ‘एकत्र आलो तर भावी सहकारी’ असा केला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या सूचक वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ” आजी माजी आणि एकत्र आले तर भावी ” असा उल्लेख करत भाषणाची सुरुवात केली त्यांच्या या उल्लेखामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे पूर्वी सोबत असलेली भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? अशा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी सर्वांसमोर मांडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय पटलावरून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत.

दरम्यान यावर आता शिवसेनेचे नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याच आदेशाने आम्ही काम करत असतो.

उद्धव ठाकरेंचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम आहे. तसेच राजकारणामध्ये काहीही घडू शकते म्हणून युती संदर्भात निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार त्यांचाच आहे.’ असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले आहे.

शिवसेनेने भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मैत्रीचा हात पुढे करत महाविकास आघाडीची स्थापन केली होती. यामुळे शिवसेना आणि भाजप यामध्ये वैर निर्माण झाले होते. पण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याने आता पुन्हा शिवसेना आणि भाजप हे पक्ष एकत्र येणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या
महाविद्यालयात बुरखा घालून महिलांच्या खोलीकडे जात होती व्यक्ती, शिक्षिकांनी बुरखा काढला तर बसला धक्का
बुरखा घालून कॉलेजमध्ये फिरत होता तरुण, शिक्षिकांनी त्याला बुटावरुन ओळखले अन् पुढे….
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी पुणे पुर्णपणे बंद, कठोर निर्बंध लावण्याचा अजितदादांचा आदेश
सौंदर्याला वयात तोलता येत नाही हे खरे! सलमानच्या हिरोईनने ५२ व्या वर्षी केला बिकीनी शूट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.