एमआयएम पक्ष महाराष्ट्रात महाविकास आघाडीशी युती करायला तयार आहे, असं वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केलं होतं. युतीसंदर्भात खासदार इम्तियाज जलील(Imtiyaz Jaleel) यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा देखील केली होती. एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला होता.(shivseana manisha kaynde tweet on devendra fadanvis)
शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे, असा टोला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला होता. आता यावर शिवसेनेने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे.
शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोसोबत शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी एक पोस्ट देखील लिहली आहे. “जनाब देवेंद्र फडणवीसजी चादर चढवताना तुमचा स्वाभिमान वाकला/ झुकला नाही का?”, असा सवाल शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी केला आहे.
https://twitter.com/KayandeDr/status/1505414312348708868?s=20&t=_T9WNyrWWj0zkoynn8YzQQ
शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “जनाब देवेंद्र फडणवीसजी, तेव्हा तुम्ही जनाब शब्दाबद्दल आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. चादर चढवताना तुमचा स्वाभिमान वाकला/ झुकला नाही का? आताच का या शब्दाबद्दल एवढा राग? अरे हो, १०५ आमदार निवडूनही भाजप महाराष्ट्रात सत्तेत नाही, त्यामुळे तुमची अस्वस्थता आहे. नाही का?” अशी खोचक टीका शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी युतीसंदर्भात दिलेल्या ऑफरवरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. “निवडणुकीत पराभव झाल्यावर विरोधकांना ईव्हीएममध्ये गोंधळ दिसतो. बी टीम दिसते, सी टीम दिसते. त्यामुळे हरल्यावर अनेक गोष्टी बोलत असतात त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही”, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
“आता सत्तेसाठी शिवसेना काय करते हे दिसून येते. शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे. अजानाची स्पर्धा भरवली जाते. त्याचा परिणाम आहे का हे दिसेल, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
सावधान! ढेकणांपासून होतोय कोरोनापेक्षा घातक आजाराचा प्रसार, अशी आहेत लक्षणे
धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट निघाला तर सर्वांना कळेल की.., करुणा शर्मांच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड
आम्हाला ‘जनाब सेना’ मग तुम्हाला ‘हिजबुल सेना’ म्हणायचं का? उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल






