आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakare) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे. या सभेत एक शिवसैनिक फाटक्या कपड्यात दिसून आला. या शिवसैनिकाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. (shivsanik ankush vagh meet with cm uddhav thakare )
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेत एक शिवसैनिक फाटक्या कपड्यात हातात वह्या घेऊन फिरत होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी हा कट्टर शिवसैनिक २०१३ सालापासून रामनाम जप करत होता. या कट्टर शिवसैनिकाचे नाव अंकुश वाघ असे आहे. अंकुश वाघ हा जालना जिल्ह्यातील पांघरी गावचा रहिवासी आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी अंकुश वाघ या कट्टर शिवसैनिकाने तब्बल ६ कोटी ७५ लाख वेळा श्री रामाचे नामस्मरण केले आहे. तसेच या प्रत्येक नामस्मरणाची अंकुश वाघने आपल्या वहीत नोंद केली आहे. श्री रामाचे नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या वह्या असतात. या वह्यांमध्ये अंकुश वाघने २०१३ सालापासून नामस्मरण लिहिण्यास सुरवात केली.
नामस्मरण लिहिण्यास सुरवात करण्यापूर्वी अंकुश वाघ या कट्टर शिवसैनिकाने एक प्रण केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी सहा कोटी वेळा श्री रामाचे नामस्मरण करेन, असा प्रण अंकुश वाघने केला होता. त्यानुसार अंकुश वाघ या कट्टर शिवसैनिकाने श्री रामाचे नामस्मरण करण्यास सुरवात केली आणि या प्रत्येक नामस्मरणाची नोंद वहीत केली.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अंकुश वाघ याने त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची भेट झाली नाही. काल सभेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी सभेत आमदार अंबादास दानवे यांनी अंकुश वाघ या कट्टर शिवसैनिकाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट घडवून दिली.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंकुश वाघ या कट्टर शिवसैनिकाचा सत्कार केला. यावेळी कट्टर शिवसैनिक अंकुश वाघने श्री रामाचे नामस्मरण लिहिलेल्या वह्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जातील त्यावेळी त्यांनी ह्या वह्या श्री रामाच्या चरणी वाहाव्यात, अशी अंकुश वाघ या कट्टर शिवसैनिकाची इच्छा आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मोठी बातमी! औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे समर्थकांचा राडा, भाजप कार्यालयावर दगडफेक
“देशात महागाई वाढत चाललीय आणि यांना चिंता कशाची तर कोणत्या मशिदीखाली शिवलिंग आहे?”
राष्ट्रवादीनेही जाहीर केले विधानपरीषदेचे उमेदवार; एकनाथ खडसेंसह ‘या’ नेत्याला पुन्हा संधी






