रायगड किल्ल्यावरील तिकीट घराचा शिवप्रेमींनी केला कडेलोट; वाचा काय आहे कारण

रायगड |  रायगडावरील चित्त दरवाजाजवळ पुरात्त्व विभाकडून किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांकडून जबरदस्तीने पैसे उकळलेले जात असल्याचा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. यामुळे शिवभक्तांनी तिकीट घराची तोडफोड करत कडेलोट केला आहे.

यावेळी शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि शिवभक्त उपस्थित होते. पर्यटकांकडून २५ रूपये कराच्या नावाखाली जबरदस्तीने वसुल केले जात होते. मात्र पैसे घेऊनसुद्धा शासनाकडून किल्ल्यावर कोणत्याच सोयीसूविधा पुरवल्या जात नव्हत्या.

अनेकवेळा शिवभक्तांनी तिकीट घर बंद करण्याची मागणी केली होती. मात्र पुरात्त्व विभागाकडून याची दखल घेण्यात येत नव्हती. अखेर शिवभक्तांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी तिकीट घराला दरीत ढकलून दिले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय! म्हणतं शिवभक्तांनी परिसर दणाणून सोडला.
महत्त्वाच्या बातम्या-
…अन् मध्यरात्री नाईट ड्रेसमध्येच नागरिक आले कोरोना लस घ्यायला; कारण वाचून बसेल धक्का
अनुष्का शेट्टी नाही तर ‘या’ अभिनेत्रीसोबत प्रभास करणार आहे लग्न; पहा फोटो
पतंजली देणार पाच लाख तरुणांना रोजगार; बाबा रामदेव यांची घोषणा
झोप लागत नसेल तर आर्मीची ‘ही’ ट्रीक वापरा, २ मिनिटांत झोप येईल

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.