शिवलीला पाटील यांचे किर्तन रंगणार बिग बाॅसच्या घरात; प्रथमच किर्तनकारांची एन्ट्री

बिग बॉस मराठी सीजन ३ च्या पर्वाला १९ सप्टेंबर पासून सुरुवात झाली असून हा कार्यक्रम कलर्स वाहिनीवरून रात्री साडे नऊ वाजता तर OTT ॲपवर संध्याकाळी सात वाजता प्रसारित केला गेला आहे. कर्करोगातून यशस्वीरित्या बरे झाल्यानंतर महेश मांजरेकर शोमध्ये होस्ट म्हणून परतले आहेत.

यावेळी बिग बॉस मराठी सीजन 3 मध्ये चित्रपट, टीव्ही, संगीत आणि सोशल मीडियावरील निवडलेल्या लोकप्रिय सेलेब्सचे मिश्रण आहे आणि स्पर्धक 100 दिवसांसाठी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. शोच्या प्रोमोची आधीच लोकांमध्ये एक जोरदार चर्चा चालू होती.

यानंतर प्रेक्षकांमध्ये स्पर्धक कोन असतील यांची उत्सुकता होती पण तीही आता दूर झाली आहे. दोन वर्षांनंतर बिग बॉस हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शोमध्ये सुप्रसिध्द किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील यांची बिग बॉस सीजन ३ मध्ये एंट्री झाली आहे.

त्यामुळे आपल्याला बिग बॉस सीजन ३ मध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होताना दिसणार आहे. शिवलीला पाटील या सोलापूर येथील बार्शी या गावातील आहेत. शीवलीला पाटील या तरुण किर्तनकार म्हणून ओळखल्या जातात. तसेच त्यांचे कीर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात.

कीर्तनकार या पुरुषप्रधान क्षेत्रात शीवलीला पाटील यांचं नाव महिला कीर्तनकार म्हणून सुप्रसिद्ध आहे. विनोदी शैलीत कीर्तन करतात.पाच वर्षांची असल्यापासूनच त्या कीर्तन करायला लागल्या. शिवलीला पाटील यांचे वडील बाळासाहेब पाटील हे देखील कीर्तनकार आहे. याशिवाय अजून काही स्पर्धक यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. देवमाणूस या मालिकेतून ओळख मिळालेली सोनाली पाटील ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दुसरा स्पर्धक विशाल निकम आहे. विशालने ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेत ज्योतिबाची भूमिका साकारली आहे.अधुरी एक कहाणी, काटा रुते कुणाला यासारख्या मालिकांतून लोकप्रियता मिळवलेली स्नेहा वाघ. याचबरोबर तृप्ती देसाई, उत्कर्ष शिंदे, सुरेखा कुडची,गायत्री दातार, मीरा जग्गनाथ,विकास पाटील अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.

 

महत्वाच्या बातम्या
बेकरीतील खारी टोस्टवर पाय दिलेला व्हिडिओ पाहून संतापली रविना टंडन, म्हणाली..
हृदयस्पर्शी! मायलेकीचा विहीरीत बुडून मृत्यू; मृत्युनंतरही चिमुकलीने आईला मारलेली मिठी तशीच होती
चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपमध्ये येण्याची आॅफर; मुश्रीफांचा सणसणाटी गौप्यस्फोट
१६ व्या वर्षी सायकलीवर गूळ विक्री, आज २० कोटी रुपयांचा टर्नओव्हर! वाचा तरुणाची यशोगाथा..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.