बिग बॉसच्या घरात कीर्तनकार शिवलीला ढसाढसा रडली; समोर आले हैराण करणारे कारण

बिग बॉस मराठी सध्या सगळेच चर्चेचा विषय ठरला आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्याच दिवशी घरामध्ये स्पर्धकांमध्ये भांडणं बघायला मिळाली आहे. मीरा आणि स्नेहामध्ये हे वाद झाले होते. त्यावेळी मीराचे जयसोबतही वाद झाले होते.

बिग बॉसच्या घरात कधी कोणासोबत वाद होईल हे सांगता येत नाही. या घरातलं आयुष्य हे जगाशी जरा वेगळं असल्यामुळे कधी कधी कोणाशी पटवून घ्यावं लागतं तर कधी वाद घालावा लागतो. अशात सुरुवातीलाच स्पर्धकांमध्ये झालेली भांडणं पाहून प्रेक्षकांनाही पुढे काय होणाच याची उत्सुकता लागलेली आहे.

यावेळी स्पर्धकांचे वेगवेगळी रुपंही प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. या घरात काही प्रेक्षक खुप बिंघास्तपणे वागताना दिसून येत आहे, तर काहींना घरातून बाहेर एलिमिनेट होण्याची भिती असल्याचे दिसून येत आहे.

अशात काही स्पर्धक हे खुपच हळव्या मनाचे असल्याचे दिसून आले आहे. घरातले वातावरण बघून भावूक होताना दिसत आहे. या घरात चिऊ ताई चिऊ ताई दार उघड हा टास्क सुरु झाला. ज्यामध्ये घरातले सर्व पुरुष महिलांना विनवणी करताना दिसून येतात.

विकास आणि उत्कर्ष या दोघांमध्ये लढत दिसून आली, त्यामध्ये उत्कर्ष विजेता ठरला. तर मीराचा स्पर्धकांसोबत वाद झाला होता, त्यामुळे तिचा राग सगळ्यांनी अनुभवला. अशा घटनांमुळे कीर्तनकार शिवलीला जराशी भावूक झाली होती आणि तिचे अश्रू अनावर झाले होते.

आईला हे बघताना कसे वाटले असेल, इथे कसे वागावे हे कळत नाहीये, असे शिवलीला मीनला सांगताना दिसत आहे. त्यानंतर मीनल म्हणते, तु खुप छान वागत आहे. चांगलं खेळत आहेस, तुझी मतही क्लियर आहे. तुला कधीही काही वाटलं तर मी तुझ्यासोबत आहे.

महत्वाच्या बातम्या-

ज्या गुरूने विद्या शिकवली त्याच गुरूला कायमचे संपवले; वाचा अट्टल गुन्हेगारालाही लाजवनारी आनंद गिरीची भयानक कृष्णकृत्ये…
अवघ्या १२ व्या वर्षी संन्यासी बनलेल्या आनंद गिरीचा थाटमाट एखादा बाॅलीवूड सेलिब्रीटीला लाजवेल
पळून जाणाऱ्या जोडप्याला कुटुंबियांनी पकडलं, गळ्यात टायर घालून भरचौकात नाचवलं; पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.